१८ तास अभ्यास करून बाबासाहेबांना अभिवादन
By admin | Published: April 15, 2016 03:16 AM2016-04-15T03:16:04+5:302016-04-15T03:16:04+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तकप्रेम आणि त्यांचा अभ्यास सर्वांसाठी आदराचा विषय आहे.
दादासाहेब काळमेघ दंत महाविद्यालयातर्फे आयोजन
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तकप्रेम आणि त्यांचा अभ्यास सर्वांसाठी आदराचा विषय आहे. बाबासाहेब २४ तासातून तब्बल १८ तास अभ्यास करायचे. बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून स्व.दादासाहेब काळमेघ दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी १८ तास अभ्यास करून त्यांना अनोखी आदरांजली वाहिली. महाविद्यालयाच्या १३८ विद्यार्थ्यांनी सकाळी ६ वाजतापासून ते रात्री १२ वाजतापर्यंत अविरत अभ्यास करून जणू बाबासाहेबांना मानवंदनाच दिली. डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि ग्रंथोत्सवाचे आयोजनही करण्यात आले. सोबतच राष्ट्रीय सेवा योजनेच्या चमूने सुराबर्डी या गावात जाऊन समता, बंधूभाव, राष्ट्रीय सलोखा आदींवर प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.(प्रतिनिधी)