बाबासाहेब हे माओवादाला प्रोत्साहन देणारे नव्हते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:09 AM2018-09-29T00:09:36+5:302018-09-29T00:10:46+5:30
मी विद्वान नाही. कार्यकर्त्यांमध्ये काम करणारा आहे. मी कसे बोलावे, याबाबत अनेकांकडून सल्ले येतात. मला जे सुचते ते कवितेच्या माध्यमातून मांडत असतो. ते कुठेही लिहून ठेवत नाही. मात्र मी कार्यकर्त्यांच्या मनाचा ठाव घेणारा असल्याने आहे, तसा आहे. असे म्हणत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकच होऊन गेले. त्यांच्या प्रमाणे दुसरे कुणी होणे नाही. बाबासाहेब हे माओवाद व नक्षलवादाला पाठिंबा देणारे नक्कीच नव्हते, असा अप्रत्यक्षपणे टोला राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता हाणला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मी विद्वान नाही. कार्यकर्त्यांमध्ये काम करणारा आहे. मी कसे बोलावे, याबाबत अनेकांकडून सल्ले येतात. मला जे सुचते ते कवितेच्या माध्यमातून मांडत असतो. ते कुठेही लिहून ठेवत नाही. मात्र मी कार्यकर्त्यांच्या मनाचा ठाव घेणारा असल्याने आहे, तसा आहे. असे म्हणत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकच होऊन गेले. त्यांच्या प्रमाणे दुसरे कुणी होणे नाही. बाबासाहेब हे माओवाद व नक्षलवादाला पाठिंबा देणारे नक्कीच नव्हते, असा अप्रत्यक्षपणे टोला राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता हाणला.
नागपुरातील डॉ. देशपांडे सभागृहात आयोजित डॉ. पूरणचंद्र्र मेश्राम कार्यगौरव सोहळ्यानिमित्त ते बोलत होते. आठवले म्हणाले, पॅन्थरच्या चळवळीत भिंती रंगविण्यापासून पोस्टर लावण्याचे काम केले. नागपुरात उंटखाना येथील पॅन्थरच्या कार्यालयात राहिलो. या दरम्यान कधी उपाशीही झोपलो. कार्यकर्त्यांचा मोठा जमावडा असल्याने आम्ही संपूर्ण नागपूर सायकले पिंजून काढत होतो. पॅन्थरमध्ये ब्राह्मणांवर शिव्याशाप व्हायचा. मात्र चळवळ हाती आल्यानंतर आम्ही ब्राह्मण्यवादाचा विरोध केला. ब्राह्मणांचा विरोध केला नाही. बाबासाहेबांच्या चळवळीत मोठ्या प्रमाणात ब्राह्मण होते. त्यांनी कधीही ब्राह्मणांचा द्वेश केला नाही. त्यांचा लढा ब्राह्मण्यवादा विरोधात होता, असेही त्यांनी सांगितले. एखाद्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आम्ही आंबेडकरी नेते व्यासपीठावर एकत्र येतो. मात्र कार्यक्रम संपला की, पाखरं उडून जातात, त्याप्रमाणे उडून जातात, असे म्हणून त्यांनी एकीकरणाच्या विषयात हात घातला.