जिल्हा परिषदेचे ५१ परिचर बनले ‘बाबू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:08 AM2021-03-06T04:08:30+5:302021-03-06T04:08:30+5:30
शुक्रवारी ही समुपदेशन प्रक्रिया घेण्यात आली. १७ फेब्रुवारीला ही सर्व प्रक्रिया होणार होती. सीईओसह विभागप्रमुखांची मुंबई येथे अनुसूचित जातीसमोर ...
शुक्रवारी ही समुपदेशन प्रक्रिया घेण्यात आली. १७ फेब्रुवारीला ही सर्व प्रक्रिया होणार होती. सीईओसह विभागप्रमुखांची मुंबई येथे अनुसूचित जातीसमोर साक्ष असल्याने ती पुढे ढकलण्यात आली होती. बिंदू नामावली, सेवा ज्येष्ठता यादी, परिचरांच्या पदोन्नतीसाठी शासनाकडून वेळोवेळी करण्यात आलेले बदल, न्यायालयीन प्रकरण, शैक्षणिक अर्हता आदी अडथळे पार करीत शेवटी शुक्रवारी त्यांना न्याय मिळाला. विशेष म्हणजे, समुपदेशन प्रक्रियेद्वारे कार्यालय निवडताच त्याच ठिकाणी सभागृहात आदेश सही करून जारी करण्यात आले. ज्या कार्यालयात पदोन्नतीने जागा भरण्यात आल्यात. त्यामध्ये वित्त, बांधकाम, शिक्षण, पशुसंवर्धन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, मनरेगा, ग्रामीण पाणी पुरवठा, पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र, माध्यमिक शिक्षण विभाग आदीचा समावेश आहे. ५१ कर्मचाऱ्यांमध्ये १३ कर्मचारी दृष्टिहीन, अस्थिव्यंग व दिव्यांग आहेत. पदोन्नतीनंतर अनेक परिचरांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला. या पदोन्नती बद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) प्रमिला जाखलेकर यांचे कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेसह संपूर्ण कर्मचारी संघटनांनी आभार मानले.