प्रवासातच दिला बाळाला जन्म : श्रमिक स्पेशलमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 11:42 PM2020-05-26T23:42:43+5:302020-05-27T00:25:58+5:30

कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे रोजगार बंद झालेले पती-पत्नी श्रमिक स्पेशलने आपल्या मूळ गावाकडे जात होते. परंतु नागपूर रेल्वेस्थानक येण्यापूर्वी पत्नीस प्रसूतिवेदना सुरू झाला. नागपुरात गाडी येताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित या महिलेस गाडीखाली उतरविले. तिला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे या महिलेने एका गोंडस बाळास जन्म दिला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या कर्तव्य तत्परतेमुळे या महिलेस वेळीच मदत मिळाली.

The baby was born during the journey: Incidents in the Labor Special | प्रवासातच दिला बाळाला जन्म : श्रमिक स्पेशलमधील घटना

प्रवासातच दिला बाळाला जन्म : श्रमिक स्पेशलमधील घटना

Next
ठळक मुद्देरेल्वे कर्मचाऱ्यांनी केली मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे रोजगार बंद झालेले पती-पत्नी श्रमिक स्पेशलने आपल्या मूळ गावाकडे जात होते. परंतु नागपूर रेल्वेस्थानक येण्यापूर्वी पत्नीस प्रसूतिवेदना सुरू झाला. नागपुरात गाडी येताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित या महिलेस गाडीखाली उतरविले. तिला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे या महिलेने एका गोंडस बाळास जन्म दिला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या कर्तव्य तत्परतेमुळे या महिलेस वेळीच मदत मिळाली.
रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे रेल्वेगाडी क्रमांक ०९२५३ सुरत-बरहमपूर श्रमिक स्पेशल ही गाडी ४.५० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर थांबली. या गाडीने संजय साहू आणि त्यांची पत्नी बिसनू साहू रा. कबी सूयानगर, बरीदा, गंजम, ओडिशा हे नातेवाईकांसह प्रवास करीत होते. ३० मिनिटे गाडी थांबल्यानंतर या गाडीला ग्रीन सिग्नल मिळाले. परंतु गाडी निघताच बिसनू साहू यांना प्रसूतिवेदना सुरू झाल्या. या महिलेच्या नातेवाईकाने तिकीट तपासणीस सुनील कुमार यांना या घटनेची माहिती दिली. सुनील कुमार यांनी लगेच या घटनेची माहिती उपस्टेशन व्यवस्थापक मनिष गौर यांना दिली. त्यांनी त्वरित गाडी थांबवून रेल्वे रुग्णालयाला सूचना केली. तेवढ्यात गाडीजवळ अनिलकुमार, सुमित शाह, जे. डी. राधे, एच. के. शाह, लोकेंद्र बावसे हे तिकीट तपासणीस पोहोचले. या महिलेस सकाळी ५.४२ वाजता गाडीखाली उतरविण्यात आले. तिला रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी स्ट्रेचरवर टाकून रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचविले. मेयो रुग्णालयात पोहोचताच या महिलेने एका गोंडस बाळास जन्म दिला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने केलेल्या मदतीसाठी संबंधित महिला, तिचा पती आणि नातेवाईकांनी रेल्वे प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

Web Title: The baby was born during the journey: Incidents in the Labor Special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.