नागपूर पोलिसांचे ‘कोरोना’ला बच्चनस्टाईल आव्हान; जब तक ये खेल खतम नहीं होता, अपुन इधरिच है...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 11:56 AM2020-03-21T11:56:02+5:302020-03-21T11:56:32+5:30

कोरोनामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली असून घराबाहेर पडण्याची धास्ती निर्माण निर्माण झाली आहे. या भयावह परिस्थितीला न घाबरता नागपूर पोलिसांनी लोकांच्या सेवेसाठी ‘... अपुन इधरिच है’, म्हणत नागरिकांनाही भीतिमुक्त राहण्याचा विश्वास दिला आहे.

Bachchanstyle challenges Nagpur police to 'Corona'; | नागपूर पोलिसांचे ‘कोरोना’ला बच्चनस्टाईल आव्हान; जब तक ये खेल खतम नहीं होता, अपुन इधरिच है...!

नागपूर पोलिसांचे ‘कोरोना’ला बच्चनस्टाईल आव्हान; जब तक ये खेल खतम नहीं होता, अपुन इधरिच है...!

Next
ठळक मुद्दे टिष्ट्वटरवरून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘जबतक ये खेल खतम नहीं होता, अपुन इधरिच है...’ महानायक अमिताभ बच्चनच्या एका चित्रपटातील हा डॉयलॉग अजूनही अनेकांना आठवत असेल. जीवावर उठलेल्या अनेक गुंडांना एकटा अन् धीरगंभीरपणे आव्हान देणारा अमिताभ कसा रुबाबदार वाटत होता त्यावेळी. महानायकाचा हाच अंदाज अन् डायलॉग आज नागपूर पोलिसांनी मारला. मात्र, गुंडांना, समाजकंटकांना नव्हे तर जगावर भीतीचे सावट निर्माण करणाऱ्या ‘कोरोना’ला उद्देशून होय.
कोरोनामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली असून घराबाहेर पडण्याची धास्ती निर्माण निर्माण झाली आहे. या भयावह परिस्थितीला न घाबरता नागपूर पोलिसांनी लोकांच्या सेवेसाठी ‘... अपुन इधरिच है’, म्हणत नागरिकांनाही भीतिमुक्त राहण्याचा विश्वास दिला आहे. पोलिसांचा हा खमकेपणा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
नागपूर पोलिसांच्या ट्विटर अकाउंटवर नेहमीच विविध विषयाला अनुसरून अत्यंत आशयपूर्ण ट्विट केले जाते. लाखो नेटकऱ्यांसाठी ते लक्ष वेधणारे असते.
शहर पोलिसांचे ट्विटर अकाउंट नेहमीच चर्चेत असते. मध्यंतरी रणवीर सिंगने स्वत:चा टपोरी टाईप अंदाजातील एक फोटो ट्विट केला होता. त्याच्या हातात लॅण्डलाईनचा रिसिव्हर दिसत होता अन् त्याचे कॅप्शनवजा प्रश्न होता ‘करू क्या डायल नंबर...शहर पोलिसांनी तो रिट्विट करून ह्यडायल हंड्रेड’ असे सूचक उत्तर दिले होते. अर्थात् १०० नंबरवर डायल कर, असे हे रिटिष्ट्वट होते. नेटकऱ्यांनी ते भलतेच उचलून धरले होते. त्या दिवशी संपूर्ण दिवसभर डायल -१०० सोबत रणवीर ट्रोल होत होता.
शहर पोलिसांचे आणखीही असेच काही ट्विट चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहे. आज पोलिसांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर पोलीस ठाण्यात मास्क लावून कार्यरत असलेल्या पोलिसांचा फोटो अपलोड केला आहे. त्याखाली ‘जब तक ये खेल खतम नहीं होता अपुन इधरिच है’ असे लिहिले आहे. पोलिसांनी यातून आपला धीरोदात्तपणा दर्शवितानाच ‘ तुम्ही घाबरू नका, आम्ही आहोत...’ असा दिलासा देण्याचाही प्रयत्न केला आहे. नेटकऱ्यांनी या ट्विटला चांगलीच पसंती दिली आहे. दुपारी ३ वाजून २३ मिनिटांनी केलेल्या या ट्विटला रात्री ८ वाजून १८ मिनिटांपर्यंत २८५ जणांनी रिटिष्ट्वट केले. १०३ कॉमेंटस् दिल्या तर, त्यावर १२७३ जणांनी लाईक्स दिले होते.

Web Title: Bachchanstyle challenges Nagpur police to 'Corona';

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.