बच्चू कडूंना पुढील उपचाराकरिता नागपूरला हलवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2023 18:26 IST2023-01-11T18:22:30+5:302023-01-11T18:26:21+5:30
Nagpur News अपघातग्रस्त आमदार बच्चू कडूंना पुढील उपचाराकरीता नागपूरला आणण्यात आले आहे.

बच्चू कडूंना पुढील उपचाराकरिता नागपूरला हलवले
नागपूरः अपघातग्रस्त आमदार बच्चू कडूंना पुढील उपचाराकरीता नागपूरला आणण्यात आले आहे. आज सकाळी एका कार्यक्रमाला जाण्याकरिता माजी मंत्री आमदार बच्चू कडू बाहेर पडले होते. यावेळी एका गाडीतून दुसऱ्या गाडीत बसण्याकरिता रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. या धडकेमुळे बच्चू कडू रस्त्याच्या दुभाजकाला धडकले. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर इजा झाली. त्यांच्या डोक्याला चार टाके लावण्यात आले आहेत.
कठोरा नाका परीसरातील आराधना चौकात हा अपघात सकाळी 6 च्या सुमारास घडला, यानंतर तिथूनच जवळच असलेल्या कीटुकले हॉस्पीटलमध्ये बच्चू कडूंना उपचाराकरीता भरती करण्यात आले. आता बच्चू कडूंना पुढील उपचाराकरिता नागपूर येथील न्युरॉन हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी नयना कडू, बच्चू कडूंच्या परीवारातील सदस्य आणि कार्यकर्ते होते.