कोट्यवधींच्या कंत्राटाकडे पाठ?

By admin | Published: October 20, 2016 03:13 AM2016-10-20T03:13:49+5:302016-10-20T03:13:49+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांशी संबंधित कामांसाठी प्रशासनाकडून कोट्यवधींचे कंत्राट देण्यात येणार आहे.

Back to the billions of contracts? | कोट्यवधींच्या कंत्राटाकडे पाठ?

कोट्यवधींच्या कंत्राटाकडे पाठ?

Next

नागपूर विद्यापीठ : तिसऱ्यांदा राबविण्यात येतेय निविदा प्रक्रिया
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांशी संबंधित कामांसाठी प्रशासनाकडून कोट्यवधींचे कंत्राट देण्यात येणार आहे. मात्र या कंत्राटाकडे कंपन्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. शासकीय नियमांनुसार पुरेशा संख्येत कंपन्यांचे अर्ज न आल्यामुळे सलग दुसऱ्यांदा फेरनिविदा मागविण्यात आल्या आहेत. कोट्यवधींच्या कंत्राटाशी संबंधित निविदांमधील मोठ्या त्रुटी ‘लोकमत’ने समोर आणल्या होत्या हे विशेष.

नागपूर विद्यापीठाची परीक्षा प्रणाली बऱ्याच अंशी ‘आॅनलाईन’ झाली आहे. ‘एमकेसीएल’ला परीक्षा प्रणालीतून दूर केल्यानंतर विद्यापीठाला सक्षम कंपनीचा शोध आहे. त्यातच यंदापासून पदवी परीक्षादेखील सत्र प्रणालीनुसार राबविण्यात येत असल्यामुळे लवकरात लवकर परीक्षांच्या कामांचे कंत्राट देणे आवश्यक झाले आहे. नवीन शैक्षणिक सत्रापासून परीक्षेचे काम दोन किंवा त्याहून अधिक कंपनी किंवा संस्थांना देण्यात येईल, असे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार विद्यापीठाकडून ‘महाटेंडर्स’ या संकेतस्थळावर नोटीस जारी करण्यात आली व ८ जून ते १० जुलै या कालावधीत इच्छुक कंपन्यांकडून ‘ई’ निविदा मागविण्यात आल्या. मात्र विद्यापीठाने या निविदांची स्वत:च्या संकेतस्थळावरदेखील माहिती दिली नव्हती. शिवाय नागपूरबाहेरील कंपन्या यात अर्जच करू शकणार नाही, अशी अट टाकली होती. त्यामुळे केवळ दोन कंपन्यांच्या निविदा आल्या होत्या. ‘लोकमत’ने ही बाब उघडकीस आणल्यानंतर विद्यापीठाने फेरनिविदा मागविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र फेरनिविदा प्रक्रियेतदेखील केवळ दोन कंपन्यांचेच अर्ज आले. शासकीय नियमांनुसार तीन कंपन्यांचे अर्ज तरी येणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यापीठाने दुसऱ्यांदा फेरनिविदा प्रक्रिया राबवली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.(प्रतिनिधी)

लवकरच निविदा उघडणार
यासंदर्भात परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांना विचारणा केली असता त्यांनी परीक्षेच्या कामामुळे निविदा अद्याप उघडण्यात आल्या नसल्याचे स्पष्ट केले. ही निविदा प्रक्रिया शासकीय नियमांनुसार राबविण्यात आली आहे. सध्या परीक्षा विभागावर परीक्षेचा ताण आहे. साधारणत: ८ ते १० दिवसांत फेरनिविदा उघडण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: Back to the billions of contracts?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.