नागपुरात फॅमिली सलूनच्या आड वेश्याव्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 11:46 PM2018-11-22T23:46:57+5:302018-11-22T23:47:49+5:30
फॅमिली सलूनच्या आड वेश्याव्यवसाय करणाऱ्या मनकापुरातील शालिनी लक्ष्मण कांबळे (वय ३६, रा. महेशनगर) तसेच तिचा साथीदार तुषार कन्हैया परसवाणी (वय २४) या दोघांना बुधवारी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून तीन तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फॅमिली सलूनच्या आड वेश्याव्यवसाय करणाऱ्या मनकापुरातील शालिनी लक्ष्मण कांबळे (वय ३६, रा. महेशनगर) तसेच तिचा साथीदार तुषार कन्हैया परसवाणी (वय २४) या दोघांना बुधवारी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून तीन तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून वेश्याव्यवसायात सक्रिय असलेल्या शालिनी कांबळेने स्वॉन फॅमिली सलून युनिसेक्स नावाने कुंटणखाना सुरू केला होता. त्यासाठी गोकुळपेठेतील लोटस बिल्डिंगमध्ये एक आलिशान सदनिका भाड्याने घेतली होती. सलूनमध्ये काम करणाºया मुलीला जास्त पैशाचे आमिष दाखवून ती त्यांच्याकडूनही वेश्याव्यवसाय करवून घेत होती. ही माहिती कळताच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त संजीव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम गौड, मीना जगताप, उपनिरीक्षक स्मिता सोनवणे, दामोदर राजुरकर, सुभाष खेडकर, सुरेखा सांडेकर, शिपाई छाया राऊत, साधना चव्हाण, फोटोग्राफार बळीराम रेवतकर आणि त्यांच्या सहकाºयांनी कारवाईसाठी सापळा रचला. बुधवारी सायंकाळी परसवाणीच्या माध्यमातून कांबळेकडे बनावट ग्राहक पाठविण्यात आले. तिने रक्कम स्वीकारून वेश्याव्यवसाय करणारी तरुणी उपलब्ध करून देताच तिला ताब्यात घेण्यात आले. कांबळे आणि परसवाणीच्या तावडीतून तीन तरुणींची सुटका करण्यात आली असून, या दोघांविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.