पहिल्याच पावसात रस्त्याची दुरवस्था, चिखल पसरल्याने भडाभड पडल्या गाड्या

By मंगेश व्यवहारे | Published: June 27, 2023 02:18 PM2023-06-27T14:18:18+5:302023-06-27T14:29:53+5:30

गेल्या तीन वर्षापासून याच परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

Bad condition of the road in the first rain; Due to the spread of mud, many vehicles slipped | पहिल्याच पावसात रस्त्याची दुरवस्था, चिखल पसरल्याने भडाभड पडल्या गाड्या

पहिल्याच पावसात रस्त्याची दुरवस्था, चिखल पसरल्याने भडाभड पडल्या गाड्या

googlenewsNext

नागपूर : पूर्व नागपुरातील एचबी टाऊन चौका पूर्वी रेल्वे अंडर ब्रिजचे काम गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे. त्यासाठी बोगदा खोदण्यात आला असून माती उपसण्यात येत आहे. ट्रकांद्वारे मातीची वाहतूक होत असताना सूर्यनगर व सोनबानगरच्या सिमेंट रोडवर मोठ्या प्रमाणात माती पडलेली होती. पण गुरुवारापासून शहरात पाऊस सुरू झाल्याने मातीमुळे संपूर्ण रस्त्यावर चिखल पसरला आहे. त्यामुळे सोमवारी रात्री पाऊस सुरू असल्यामुळे भरधाव जाणाऱ्या दुचाकी घसरून अनेकजण पडले. गेल्या तीन वर्षापासून याच परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

पूर्व नागपुरातील पारडी, वर्धमाननगर, एचबी टाऊन, डिप्टी सिग्नल, जुना भंडारा रोडवर पुलाचे बांधकाम अनेक वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे रस्त्याचे खोदकाम करण्यात येत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतुकही आहे. पावसाळ्यात या खोदकामाचे दुष्पपरिणाम दिसून येत आहे. खोदकामाची माती रस्त्यावर पसरल्याने रस्ते चिखलमय झाले आहे. त्यातच रात्रीला पथदिवे बंद असल्याने दुचाकी चालकांना वाहन चालविताना प्रचंड त्रास होत आहे.

सोमवारी रात्री पाऊस असल्यामुळे अनेकजणांची वाहने वेगात असल्याने चिखलामुळे त्यांची वाहने घसरली. जवळपास १५ दुचाकी रस्त्यावर घसरून पडल्याने चालकांचे कपडे भरले काहीजण किरकोळ जखमीही झाले. काही स्थानिकांनी रस्त्यावर उभे राहून वाहनचालकांना सावध करण्याचा प्रयत्न केला. पण वाहनांच्या पडझडीमुळे लोकं संतापले होते. तीन वर्षापासून अशाच परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला.

Web Title: Bad condition of the road in the first rain; Due to the spread of mud, many vehicles slipped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.