नागपुरात जराशा पावसाने रस्त्यांची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 12:45 AM2020-07-14T00:45:51+5:302020-07-14T00:47:00+5:30
पावसाळ्याच्या सुरुवातीच सव्वा महिन्यात शहरातील रस्ते खराब होत आहेत. आतापर्यंत मध्यम पाऊस झाला आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस होतो, अशा अवस्थेत शहरातील रस्त्यांची स्थिती अजून खराब होईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाळ्याच्या सुरुवातीच सव्वा महिन्यात शहरातील रस्ते खराब होत आहेत. आतापर्यंत मध्यम पाऊस झाला आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस होतो, अशा अवस्थेत शहरातील रस्त्यांची स्थिती अजून खराब होईल.
सध्या अनेक रस्त्यावर गिट्टी, माती आणि धूळ जमली आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकातर्फे रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मोहीम चालविली जाते. मात्र यावेळी कोविड १९ च्या प्रकोपामुळे तीन महिने टाळेबंदी लागल्याने रस्त्यांच्या दुरुस्तीकडे कुणी विशेष लक्ष दिले नाही. दरवर्षी हॉटमिक्स विभागाला गिट्टी, डांबर टाकण्यासाठी चार ते पाच कोटी रुपये मंजूर केले जातात. मागील स्थायी समितीने डांबर व गिट्टी खरेदीला मंजुरी दिली होती. मात्र महापालिकेच्या वाईट आर्थिक स्थितीमुळे दुरुस्तीची कामे रखडली आहेत. दुसरीकडे शहरातील प्रस्तावित सिमेंट रस्ते, विजेच्या तारा अंडरग्राऊंड करणे आदी कामामुळे रस्ते खराब झाले आहेत. मेट्रो कॉरिडॉर, उड्डाणपूल आदी कामे ज्या भागात होत आहेत त्या भागातील रस्ते अतिशय खराब झाले आहेत.