वाईट हवामान : दुबई-दिल्ली विमानाचे नागपुरात लँडींग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:54 AM2019-12-31T00:54:24+5:302019-12-31T00:56:47+5:30
दिल्लीमध्ये पडलेल्या घनदाट धुक्यामुळे दिल्लीला जाणारे विमान नागपूरकडे वळवून उतरविण्यात आले. दिल्लीमधील वाईट हवामानामुळे ऐनवेळी हा निर्णय घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिल्लीमध्ये पडलेल्या घनदाट धुक्यामुळे दिल्लीला जाणारे विमान नागपूरकडे वळवून उतरविण्यात आले. दिल्लीमधील वाईट हवामानामुळे ऐनवेळी हा निर्णय घेण्यात आला.
फ्लाय दुबई एयरलाईन्सचे हे विमान एफडीबी-४३१ दुबई-दिल्ली दुपारी १२.१० वाजता नागपूरला वळविण्यात आले. त्यानंतर दुपारी २.२० वाजता हे विमान दिल्लीकडे रवाना झाले. दोन दिवसांपूर्वीदेखील लखनौमध्ये बिघडलेल्या वातावरणामुळे एक आंतरराष्ट्रीय विमान नागपूरकडे वळविण्यात आले होते. शनिवारी सकाळी फ्लाय नास एयरलाईन्सचे विमान केएनई-३३३ रियाद-लखनौ हे नागपुरातील विमानतळावर उतरविण्यात आले होते.
दोन उड्डाण रद्द
सोमवारी इंडिगो एयरलाईन्सच्या दोन विमानांची उड्डाने रद्द करण्यात आली. यात ६-ई ४३६ इंदोर-नागपूर आणि ६-ई २२१ दिल्ली-नागपूर या दोन विमानसेवांचा विमानांचा समावेश आहे. विमानतळ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तात्रिक कारणांमुळे ही उड्डाने रद्द करण्यात आली आहेत.