नागपूर रेल्वे स्थानकावरील बॅग स्कॅनर दीड महिन्यापासून बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 11:50 PM2018-06-20T23:50:35+5:302018-06-20T23:50:50+5:30
प्रवाशांच्या बॅगमध्ये आक्षेपार्ह वस्तू आहे की नाही हे तपासण्यासाठी पश्चिमेकडील भागात लावण्यात आलेली बॅग स्कॅनर मशीन मागील दीड महिन्यापासून बंद आहे. यामुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून रेल्वे प्रशासनाने ही मशीन तातडीने सुरू करण्याची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवाशांच्या बॅगमध्ये आक्षेपार्ह वस्तू आहे की नाही हे तपासण्यासाठी पश्चिमेकडील भागात लावण्यात आलेली बॅग स्कॅनर मशीन मागील दीड महिन्यापासून बंद आहे. यामुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून रेल्वे प्रशासनाने ही मशीन तातडीने सुरू करण्याची गरज आहे.
नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील भागात दोन बॅग स्कॅनर मशीन लावण्यात आल्या आहेत. परंतु पश्चिमेकडील बॅग स्कॅनर मागील दीड महिन्यापासून बंद अवस्थेत आहे. रेल्वे प्रशासनाने घातलेल्या काही अटी या मश्ीानचे मेन्टेनन्स करणाºया कंपनीला मान्य नसल्यामुळे या कंपनीने आपला करार रद्द केल्याची माहिती आहे. त्यामुळे मागील दीड महिन्यापासून ही मशीन बंद अवस्थेत आहे. यामुळे प्रवाशांच्या बॅग तपासणीविनाच रेल्वेस्थानकाच्या आत जात असून यामुळे गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. बॅग स्कॅनरमुळे आजपर्यंत अनेक महत्त्वाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या बॅग स्कॅनरची त्वरित दुरुस्ती करण्याची गरज आहे.
कंपनीचे लोक येणार
‘बॅग स्कॅनर मशीनच्या देखभालीचा करार हैदराबादच्या कंपनीशी झालेला आहे. ही मशीन दुरुस्त करण्यासाठी कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. गुरुवारी कंपनीचे लोक बॅग स्कॅनरच्या दुरुस्तीसाठी येणार आहेत.’
ज्योती कुमार सतीजा, कमांडंट, रेल्वे सुरक्षा दल