नागपुरात जमालने पूर्ण केले शेरो-शायरीचे १०० तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:47 AM2018-12-01T00:47:53+5:302018-12-01T00:51:29+5:30

गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये १२८ तासांचा रेकॉर्डची नोंद करण्यासाठी आगेकूच करीत असलेल्या नगरसेवक शायर मोहम्मद जमाल यांनी शुक्रवारी शेरोशायरीचे १०० तास पूर्ण केले.

Bagal completed 100 hours of Shero-Shayari in Nagpur | नागपुरात जमालने पूर्ण केले शेरो-शायरीचे १०० तास

नागपुरात जमालने पूर्ण केले शेरो-शायरीचे १०० तास

Next
ठळक मुद्दे१२८ तासांच्या गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डकडे आगेकूच

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये १२८ तासांचा रेकॉर्डची नोंद करण्यासाठी आगेकूच करीत असलेल्या नगरसेवक शायर मोहम्मद जमाल यांनी शुक्रवारी शेरोशायरीचे १०० तास पूर्ण केले.
पाचव्या दिवशी शुक्रवारी सकाळी शायर जमालची प्रकृती बिघडली. त्यांच्या गळ्यात इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांचा आवाज बसला होता. यामुळे आयोजकांची चिंता वाढली होती. शायर जमालच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी नातेवाईकही सभागृहात जमले. स्थानिक नागरिकांनी मशीदमध्ये जाऊन जमालच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली. दुपारी डॉक्टरांची चमू तपासासाठी पोहोचली. पाच दिवसात जमालचे वजन चार किलोग्रॅम कमी झाले आहे. त्यांच्या गळ्यातून आवाज निघताना होणारा त्रास आणि नाजुक प्रकृतीमुळे आयोजक मनीष पाटील यांनी १०० तास पूर्ण झाल्याचे सांगून धोका न पत्करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या समोरच जमालला उलट्या झाल्या. परंतु त्यानंतरही जमालने प्रकृती ठीक असल्याचे सांगून १२८ तासांचा विक्रम करण्याचा निर्णय घेतला. संविधानाच्या जनजागृतीच्या उद्देशाने विक्रम करण्याचे ध्येय समोर ठेऊन मो. जमालने २६ नोव्हेंबरला संविधान दिनी शेरोशायरीला सुरुवात केली होती. त्यांच्या प्रकृतीकडे डॉक्टरांची चमू लक्ष ठेवून आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अभिषेक शंभरकर, बाबुल डे, प्रवीण भिवगडे, नितीन पाटील, गौतम पाटील, राजू चांदेकर, आशिष वासनिक परिश्रम घेत आहेत.
विक्रम नोंदविणारच
प्रकृती बिघडली तरी मो. जमाल यांनी विक्रम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रेक दरम्यान त्यांनी १२८ तासांचा विक्रम नोंदविणारच असल्याचे सांगितले.

Web Title: Bagal completed 100 hours of Shero-Shayari in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर