बागडाेर नाल्याला हवी सुरक्षा भिंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:11 AM2021-06-09T04:11:01+5:302021-06-09T04:11:01+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : अतिक्रमण आणि झुडपांच्या विळख्यात सापडलेला बागडाेर नाला कामठी शहरासह तालुक्यातील रनाळा व येरखेडा येथील ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : अतिक्रमण आणि झुडपांच्या विळख्यात सापडलेला बागडाेर नाला कामठी शहरासह तालुक्यातील रनाळा व येरखेडा येथील नागरिकांसाठी डाेकेदुखी ठरला आहे. पावसाळ्यापूर्वी या नाल्याची साफसफाई करून त्याला सुरक्षा भिंत बांधणे अत्यावश्यक असताना ही कामे करण्यात न आल्याने या नाल्याकाठी राहणाऱ्यांना पुराचा फटका बसण्याची शक्यता बळावली आहे.
कामठी शहरातील भाजीमंडी परिसरासह रनाळा व येरखेडा मार्गे वाहणारा हा नाला कन्हान नदीत विलीन हाेताे. पात्रात बाभळीसह इतर झाडे व झुडपे वाढल्याने पावसाचे पाणी व्यवस्थित वाहून जात नाही. त्यामुळे या नाल्याकाठच्या कामठी शहरातील मातंग समाजनगर, कामगारनगर, वारीसपुरा, नया गोदाम, वीणकी कॉलनी तसेच येरखेडा व रनाळा येथील घरांमध्ये पुराचे पाणी शिरत असल्याने तसेच घरातील साहित्य व जीवनावश्यक वस्तू भिजत असल्याने नागरिकांचे माेठे आर्थिक नुकसान हाेते.
ही समस्या कायमस्वरुपी साेडवण्यासाठी या नाल्याला सुरक्षा भिंत बांधण्याची पूर्वीपासून मागणी केली जात आहे. परंतु, या मागणीकडे अद्यापही गांभीर्याने बघितले नाही. दरवर्षी या नाल्याच्या पुराचे पाणी घरांमध्ये शिरते आणि नागरिकांचे नुकसान हाेते. तक्रारीनंतर सर्वेक्षण, पंचनामे, नुकसान भरपाई आदी साेपस्कार पार पाडले जातात. परंतु, ही समस्या कामयस्वरूपी निकाली काढण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही.
...
प्रस्तावासाेबतच निधीही रखडला
या नाल्याच्या सुरक्षा भिंत बांधकामाचा प्रस्ताव करण्याचे करण्याचे निर्देश तत्कालीन पालकमंत्र्यांनी २०१७ मध्ये स्थानिक नगर परिषद प्रशासनाला दिले हाेते. पालिका प्रशासनाने हा प्रस्ताव तयार करण्याकडे दुर्लक्ष केले. प्रस्ताव शासनाकडे सादर न झाल्याने निधीही मिळाला नाही. त्यामुळे या कामासाठी निधीही न मिळाल्याने सुरक्षा भिंतीचे काम करण्यात आले नाही. याला प्रशासनाची अनास्था जबाबदार असल्याचा आराेप नागरिकांनी केला असून, ही समस्या साेडविण्याची मागणीही केली आहे.