बा ल गो पा लां ची धम्माल

By admin | Published: August 27, 2014 01:00 AM2014-08-27T01:00:22+5:302014-08-27T01:00:22+5:30

डीजेच्या तालावर गाणी...आंब्याची पाने आणि फुग्यांचे तोरण...रंगरंगोटी करून सजविलेले लाकडी बैल...अर्ध्या फुटापासून ते पाच फुटापर्यंतचे डौलदार आकर्षक बैल...यात कुणी बैलासह

Bala Go Pa Launcham Dhammal | बा ल गो पा लां ची धम्माल

बा ल गो पा लां ची धम्माल

Next

नागपूर : डीजेच्या तालावर गाणी...आंब्याची पाने आणि फुग्यांचे तोरण...रंगरंगोटी करून सजविलेले लाकडी बैल...अर्ध्या फुटापासून ते पाच फुटापर्यंतचे डौलदार आकर्षक बैल...यात कुणी बैलासह लावलेला सामाजिक संदेश...सजलेले बैल अन् नटलेले चिमुकले...खाऊची धम्माल...बोजाऱ्याचे समाधान आणि मुलांनी केली देवी- देवतांपासून महापुरुषांची वेशभूषा...सर्वांचेच कौतुक...अशा उत्साहपूर्ण वातावरणात शहरात अनेक ठिकाणी तान्हा पोळा पार पडला.
नवीन सुभेदार ले-आऊट
बालगोपालांचा उत्साहाचा सण असलेला तान्हा पोळा नवीन सुभेदार लेआऊट येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला. अमर शहीद विजयभाऊ कापसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेल्या २० वर्षांपासून तान्हापोळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. दक्षिण नागपुरात या पोळ्याची ख्याती सर्वत्र पसरली असून, जवळपास दोन हजार बालगोपालांनी बैलांना आकर्षक सजावट करून, पोळ्यात आणले होते. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या उपस्थितीत पोळा फुटला. आयोजकांकडून आकर्षक नंदी सजावट पुरस्कार व वेशभूषा पुरस्काराने प्रत्येकी पाच जणांना रोख रक्कम व ट्रॉफी देऊन पुरस्कृत करण्यात आले. मुलांनी आकर्षक बैल सजावटीच्या माध्यमातून पर्यावरण, अंधश्रद्धा, शेतकरी आत्महत्या, महागाई, स्त्री अत्याचार या सामाजिक विषयावर संदेश दिले. नगरसेवक दीपक कापसे यांच्या नेतृत्वात हा पोळा साजरा करण्यात आला. यावेळी नगरसेविका सीमा राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश्वर एन.सिंग, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मुंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी.व्ही.लोखंडे उपस्थित होते. कापसे यांच्या नेतृत्वात गोविंदराव मोंढे, श्रीराम मांडस्कर, किशोर करांगळे, ए.बी.जिचकार, मधुसूदन मुडे, डॉ. गणेरीवाल, डॉ.बी.चौधरी आदींच्या उपस्थितीत तान्हा पोळा साजरा करण्यात आला.
जयताळा
तान्हा पोळ्याच्यानिमित्ताने ज्ञानदीप बहुउद्देशीय शैक्षणिक संस्थेच्यावतीने जयताळास्थित ज्ञानदीप शाळेत सुनील इंदूवामन ठाकरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी बैलाचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व यावर मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांकडून काही गेम्स करवून घेतले. कार्यक्रमाला प्राचार्या माधवी शिंदे, उपप्राचार्य अनुराधा लोणारे, सुमित महतपुरे, उमाकांत जीवतोडे आदी उपस्थित होते. संचालन शंपा विश्वास यांनी तर आभार स्वाती बुरंगे यांनी मानले. सीमा खान, प्रीती पांडे, ब्युटी मारवाडे, सारिका उईके, शुभांगी वाळके, गावंडे आदींनी विशेष सहकार्य केले.
गांधी चौक, सदर
सदर गांधी चौक पोळा समिती यांच्या तान्हा पोळा महोत्सवाचे हे ९० वे वर्षे होते. कार्यक्रमाचे आयोजन सुनील चोपडा यांनी केले. यावेळी सहभागी मुलांना परिसरातील दुकानदार संघ यांच्यावतीने शालेपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले.
जानकीदेवी जैस्वाल विद्यालय
श्रीमती जानकीदेवी जैस्वाल विद्यालयात तान्हा पोळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांसाठी शेतकरी वेशभूषा स्पर्धा, बैल सजावट स्पर्धा व दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे सचिव महेंद्रकुमार जैस्वाल, प्राचार्य संध्या जैस्वाल, मुख्याध्यापिका आशा भोले व अमरनाथ यादव आदी उपस्थित होते. संचालन विद्या भोयर यांनी केले तर आभार स्वाती चरडे यांनी मानले.
राजा मारुती मंदिर,
नवीन सुभेदार
जय हनुमान सांस्कृतिक युवा मंडळाच्यावतीने व ज्येष्ठ नागरिक कृती समितीच्या सहकार्याने राजा मारुती मंदिर, नवीन सुभेदार येथे तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवराव राऊत, अगस्ती चव्हाण, दिवाकर रामटेके, शरद नेवारे व धोटे यांनी सहकार्य केले.
राजाबाक्षा
राजाबाक्षा नागरिक सेवा समिती व जय दुर्गा उत्सव मंडळ यांच्यावतीने तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समितीच्या ज्येष्ठ मंडळींनी शंकराची गाणी गायिली. आलेल्या चिमुकल्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. नंदीची पूजा करून चॉकलेट दिले. यावेळी एका चवथ्या वर्गाच्या विद्यार्थ्याने यावर्षी पडलेल्या दुष्काळाचे चित्र उभे करून शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले. उत्सवाच्या आयोजनासाठी सुनील काडगाये, विष्णु भुते, दिनकर वानखेडे, राजू कुंभलकर, मुकेश खराबे, पंचांग चकोले, अविनाश ईश्वरकर, दिलीप बांते, शंकर बजवे, अरविंद बांते व धनराज इश्वरकर आदींनी सहकार्य केले.
कृष्ण मंदिर, सुर्वे ले-आऊट
अयोध्यानगर, रघुजीनगर सिमेंट रोडवरील कृष्ण मंदिर सुर्वे ले-आऊट, येथे स्व. पुरुषोत्तम बापू मते व्यायाम शाळा यांच्याकडून तान्हा पोळा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या पोळ्यात नंदी सजावटीसाठी आकर्षक बक्षीस असल्याने, मोठे व आकर्षक सजावट केलेले नंदी येथे बघायला मिळाले. शिवाय फॅन्सी ड्रेस स्पर्धेचेही आयोजन करण्यात आल्याने, मुलांनी आकर्षक वेशभूषा करून पोळ्यात हजेरी लावली होती. पोळ्यात प्रमुख अतिथी म्हणून आमदार दीनानाथ पडोळे, प्रमोद मानमोडे, माजी नगरसेवक विजय बाभरे, जयंत लुटे आदी उपस्थित होते. नंदी सजावट स्पर्धेत पहिल्या रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात आली. तर फॅन्सी ड्रेस स्पर्धेत पहिल्या पाच मुलांना रोख पुरस्कार देण्यात आला. या पोळ्यात आत्महत्या करणारा शेतकरी, वनराई, बेटी बचाव, हागणदारी मुक्त गाव,
आधुनिक शेती याचे दृश्यही साकारण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष गणेश धोटे, सचिव संदीप कदम, महेश बांते, बबलू आंबेकर, सचिन मते, मंगेश बेदी, आनंद कारवडे, माजी उपमहापौर किशोर कुमेरिया , सुरेश धावडे, प्रवीन निरगुडे, डॉ. बजाज, यांच्यासह प्रकाश भांदकर, किशोर देशकर, संदीप कदम, मंगेश बेदी आदींनी आयोजनासाठी विशेष सहकार्य केले. फॅन्सी ड्रेस स्पर्धेत दहा हजार रुपयांचा प्रथम पुरसकार अविनाश देशमुख याने तर पाच हजार रुपयांचा दुसरा पुरस्कार आचल हुंगे याने पटकाविला. यावेळी कुश बांते, यश भेले, निलय प्रदीप कदम, प्रशांत गवळी व अनिरुद्ध तापस यांना विशेष पुरस्कार देण्यात आले.
इतवारी गरुड खांब रोड
इतवारी गरुड खांब रोड येथे तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भूषण मुळे, डोणगावकर, किशोर मुळे, दर्यापूरकर आदींनी लाकडी बैलाची पूजा करून, प्रसाद वितरित करून त्यांना बोजारा दिला.
ललिता पब्लिक स्कूल
शाळेत तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या संचालिका चेतना टांक, राधिका टांक, ललिता टांक, प्राचार्य विनिषा मेनन यांची यावेळी उपस्थिती होती. विद्यार्थी सजविलेले बैल आणि पारंपारिक वेशभूषा करून तान्ह्या पोळ््यात सहभागी झाले होते. बैल सजावट स्पर्धेत गरिमा टांक, लोकेश साहरे, कार्तिक खोड, लक्ष्य मंजेटिया, सोहम पिटूले, आर्या जोशी, श्रीजा कुंभालकर, मयंक काबरा, योगित थवरानी, ऐश्वर्या शर्मा यानी पारितोषिक पटकावले. शाळेच्या संचालिका चेतना टांक यांनी विद्यार्थ्यांना मिठाईचे वितरण केले.
सिनिअर भोसला ग्रुप
बालगोपालांना बैलाचे महत्त्व कळावे यासाठी श्रीमंत राजे रघुजी भोसले यांनी हा उत्सव सुरू केला. त्यांनी लाकडी बैल तयार करून लहान मुलांना वाटले. या बैलांना जिवंत बैलाप्रमाणे सजविण्यात आले. आंब्याचे तोरण बांधून त्याला जिलेबी, फळ, चॉकलेट, बिस्किट असे तोरण बांधले. ते लहान मुलांना या लाकडी बैलाजवळ उभे करून बैलांची पूजा करायचे. श्रीमंत राजे मुधोजीराव भोसले यांच्या वाड्यात सर्वात मोठा लाकडी बैल आहे. या बैलाची उंची ८ फूट व लांबी ६ फूट आहे. बैलाच्या पायात चांदीचा तोडा घातला आहे. दरवर्षी या बैलाची महाल परिसरात मिरवणूक काढण्यात येते.
हिंदू ज्ञानपीठ महाल
महालच्या हिंदू ज्ञानपीठात बैल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. रॅलीत विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. यावेळी रक्षाबंधनानिमित्त वैदिक राखी स्पर्धा घेण्यात आली. यात मुलींनी वर्गातील मुलांना राखी बांधली. कार्यक्रमात पालकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Bala Go Pa Launcham Dhammal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.