निसर्ग आणि अर्थव्यवस्थेचा समतोल आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:17 AM2020-12-03T04:17:59+5:302020-12-03T04:17:59+5:30

हार्दिक रॉय नागपूर : २ डिसेंबर हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून साजरा केला जातो. १९८४ साली ...

A balance of nature and economy is essential | निसर्ग आणि अर्थव्यवस्थेचा समतोल आवश्यक

निसर्ग आणि अर्थव्यवस्थेचा समतोल आवश्यक

Next

हार्दिक रॉय

नागपूर : २ डिसेंबर हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून साजरा केला जातो. १९८४ साली याच दिवशी मध्य प्रदेशामध्ये भोपाळ गॅस दुर्घटना झाली होती. ही देशातील सर्वात वाईट औद्योगिक दुर्घटना ठरली ज्यामध्ये ३७०० च्यावर नागरिकांनी आपले प्राण गमावले. कीटनाशकांच्या युनियन कार्बाईड इंडिया लिमिटेड या कंपनीत ही दुर्घटना घडली होती. मिथिल आयसोसायनाईड वायूची गळती झाल्याने ५ लाखावर नागरिक प्रभावित झाले होते. लोकमतने पर्यावरण संशोधक व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या तज्ज्ञांशी चर्चा करून येणाऱ्या काळात काय उपाययोजना आखता येईल, याबाबत माहिती घेतली.

नीरीच्या हवामान निर्भरता आणि कौशल्य विकास विभागाचे प्रमुख आणि प्रमुख वैज्ञानिक डॉ जे. एस. पांडे म्हणाले, ही दुर्घटना जगातील सर्वात वाईट औद्योगिक दुर्घटना होती. आर्थिक नुकसान तर झालेच पण हानिकारक वायूमुळे झालेली मानवी हानी दुःखदायक होती. अशा दुर्घटना कित्येक पिढ्या प्रभावित करतात. यावर नियंत्रणासाठी इंडस्ट्रीयल कमर्शियल ॲग्रीकल्चर फॉरेस्टरी अँड रेसिडेंसियल ॲक्टिव्हिटी (आयसीइएफआर) समुद्र किनाऱ्याचे समतोल संशोधनाची प्रामाणिक अंमलबजावणी करावी लागेल. ते राज्य स्तरावर आणि नंतर जिल्हास्तरावर आकडे गोळा करून करावी लागेल. हे आकडे गरजेचे आहेत कारण सर्व वैज्ञानिक, आर्थिक आणि औद्योगिक विकास पर्यावरणातूनच होत असतो. त्यामुळे स्रोतांचा धोरणात्मक व विकासात्मक उपयोग होणे आवश्यक आहे. हा समतोल सध्या दिसत नाही. शहरालगतची मोठी जमीन विकास कामांसाठी आरक्षित करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत ही जमीन आर्थिक कामासाठी आणि पर्यावरणाच्या कामात उपयोगी आणणे शक्य आहे. कोविड सारखी स्थिती लक्षात घेत अशा जमिनीच्या समतोल विकासासाठी कार्यक्रम आखणे आवश्यक आहे.

इंटरनेटमुळे सध्याची पिढी जागरूक आहे आणि जबाबदारही आहे. त्यामुळे शालेय स्तरावर त्यांना पर्यावरणाविषयी प्रोत्साहित करणे आवश्यक असल्याचे डॉ पांडे म्हणाले. त्यासाठी शाळेत पर्यावरणसंबंधी उपक्रम घेणे गरजेचे असून त्याची तीव्रता वाढवावी लागेल. पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहित करावे. पर्यावरणासोबत अर्थव्यवस्था समजणे अधिक लाभदायक असल्याचे त्यांना कळायला हवे.

राष्ट्रीय आपत्ती निवारण कृती अकॅडमीचे माजी संचालक मनीष रंजन म्हणाले, कोविडमुळे सध्या वापरात असलेले मास्क आणि सॅनिटायझरचे नियम पालन हा आपल्या जीवनाचा भाग व्हायला हवा. आपल्या पूर्वीची पिढी चांगल्या आरोग्यासाठी वैयक्तिक स्वच्छता पालन करण्यात कठोर होती आणि ही संस्कृती आपण विसरत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आपत्ती केवळ नैसर्गिक नसते तर मनुष्य निर्मितही असते. भोपाळ गॅस दुर्घटना ही औद्योगिक होती आणि आजच्या काळात अशाप्रकारे दुर्घटना घडली तर त्याची लोकसंख्येमुळे हानी अतिशय भयानक असेल. एनडीआरएफ टास्क फोर्सची स्थापना आपत्ती व्यवस्थापन करण्यासह जागृती आणि सजगता निर्माण करण्यासाठी झाली आहे. कोरोना ही सुद्धा जैविक आपत्ती असून संसर्गजन्य असल्याने मास्क वापरणे गरजेचे आहे. हा मास्क आपल्याला इतर विषाणू, जिवाणू आणि वाहन व औद्योगिक निघणाऱ्या प्रदूषणापासूनही सुरक्षित करतो. त्यामुळे त्यांचा उपयोग स्मार्टपणे आणि नियमित करणे आवश्यक आहे.

आपत्ती ही मानवाच्या नियंत्रणात नाही पण त्यासाठी तयार राहणे आपल्या हातात आहे. म्हणून पूर्व नियंत्रण राखणे समजून घेणे गरजेचे आहे. प्राथमिक सुरक्षा पालन करण्यासह प्रदूषणाचे आणि आजारांचे प्रकार, आपल्या कृतीचे परिणाम समजून घेणे आवश्यक आहे. आपल्याला आरोग्यविषयक पूर्वनियोजन कृती जाणून घेणे आवश्यक असल्याचे मत रंजन यांनी व्यक्त केले.

Web Title: A balance of nature and economy is essential

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.