बाल्या बिनेकर हत्याकांड : पडद्यामागचे सूत्रधार पडद्यामागेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 12:03 AM2020-10-03T00:03:54+5:302020-10-03T00:05:37+5:30

Balya Binekar murder case, crime news, Nagpur सर्वत्र प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या बाल्या बिनेकर हत्याकांडातील पडद्यामागच्या आरोपींना हुडकून काढण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. दरम्यान, या प्रकरणाचा तपास रेंगाळत असल्याचा आता आरोप होत आहे.

Balya Binekar murder: facilitator behind the curtain | बाल्या बिनेकर हत्याकांड : पडद्यामागचे सूत्रधार पडद्यामागेच

बाल्या बिनेकर हत्याकांड : पडद्यामागचे सूत्रधार पडद्यामागेच

googlenewsNext
ठळक मुद्देतपास रेंगाळल्याची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वत्र प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या बाल्या बिनेकर हत्याकांडातील पडद्यामागच्या आरोपींना हुडकून काढण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. दरम्यान, या प्रकरणाचा तपास रेंगाळत असल्याचा आता आरोप होत आहे. त्यामुळे मृताचे नातेवाईकच नव्हे तर गुंडांच्या दहशतीने थरारलेल्या नागपूरकरांमध्येही पोलिसांच्या कार्यपद्धतीमुळे रोष निर्माण झाला आहे.
या हत्याकांडाला आता सात दिवस पूर्ण झाले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या पाच आरोपींना आणि त्यांना मदत करणाऱ्या दोन अशा एकूण सात जणांना अटक केली आहे. मात्र या हत्याकांडाचा पडद्यामागे राहून कट रचणाऱ्या आरोपींना पकडण्यात सीताबर्डी पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. जुगार चालविण्याच्या स्पर्धेतून हे हत्याकांड घडवून आणल्याची शहरभर जोरदार चर्चा आहे. या हत्याकांडाला शहरातील गुन्हेगारांच्या मांडवल्या करून देणाऱ्या आणि मोठमोठ्या जुगाऱ्यांची रक्कम इकडून तिकडे करणारा एक कुख्यात जबाबदार असल्याचीही सर्वत्र चर्चा आहे. मात्र त्याला पकडण्यात पोलिसांनी आतापर्यंत यश मिळवले नाही. या संबंधाने उलटसुलट चर्चा सुरू आहे. तपासाशी संबंधित असलेल्या एकाने जुगार अड्ड्यावरचा तीन वर्षांपूर्वी भरपूर मलिदा खाल्ल्यामुळे तो गुन्हेगारी वर्तुळातील चर्चेकडे दुर्लक्ष करीत असल्याचीही जोरदार चर्चा आहे. सात दिवस होऊनही या हत्याकांडाचे फंड सप्लायर तसेच पडद्यामागचे सूत्रधार पोलिसांनी पकडलेले नाहीत. तपासही रेंगाळल्यासारखा झाला आहे. त्यामुळे मृताचे नातेवाईक, समर्थक तसेच दहशतीत असलेल्या नागरिकांमध्येही रोष निर्माण झाला आहे.

खामल्याची चर्चा
दरम्यान, या गुन्ह्याशी संबंध असल्याच्या चर्चेवरून गुन्हे शाखेत आतापर्यंत डझनभर संशयितांची चौकशी करण्यात आली आहे. आजही खामल्यातील एकाची चौकशी करण्यात आल्याची जोरदार चर्चा होती. मात्र कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याकडून या वृत्ताला दुजोरा मिळू शकला नाही.

Web Title: Balya Binekar murder: facilitator behind the curtain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.