वीजनिर्मिती केंद्राच्या राखेवर बहरले बांबूचे वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:10 AM2021-01-20T04:10:59+5:302021-01-20T04:10:59+5:30

नागपूर : जिल्ह्यातील खापरखेडा व कोराडी विद्युत निर्मिती केंद्र हे प्रदूषणाचेच केंद्र ठरले आहेत. येथून निघणाऱ्या राखेमुळे केवळ नागरिकांचे ...

Bamboo forest blooms on the ashes of the power plant | वीजनिर्मिती केंद्राच्या राखेवर बहरले बांबूचे वन

वीजनिर्मिती केंद्राच्या राखेवर बहरले बांबूचे वन

Next

नागपूर : जिल्ह्यातील खापरखेडा व कोराडी विद्युत निर्मिती केंद्र हे प्रदूषणाचेच केंद्र ठरले आहेत. येथून निघणाऱ्या राखेमुळे केवळ नागरिकांचे आरोग्यच नाही तर आसपासच्या शेतातील पिकेही धोक्यात आली आहेत. मात्र धोकादायक राखेचे हे प्रदूषण कमी करण्यासाठी नीरीच्या वैज्ञानिकांनी जबरदस्त उपाय करून दाखवला आहे. नीरीच्या ‘इको रिज्युविनेशन टेक्नालॉजी’ (ईआरटी)च्या माध्यमातून या दोन्ही वीज केंद्रांच्या राखेवर १०० एकरच्या परिसरात बांबूची लागवड केली आहे. राखेवर ३०-३५ फूट वाढलेल्या हजारो झाडांचे बांबूवन पाहून राखेवर काहीच उगवत नाही, हा समज खोटा ठरवला आहे.

औष्णिक विद्युत केंद्रात जळणाऱ्या कोळशापासून निघणारी राख (फ्लाय अ‍ॅश) ही वायुप्रदूषणाचे अतिशय धोकादायक कारण आहे. राखेमध्ये असलेल्या जड धातूंमुळे कॅन्सर व इतर भीषण आजार होण्याचा धोका असतो. शिवाय ही राख पिकांनाही हानिकारक असते. कोराडी, खापरखेडा विद्युत केंद्राच्या परिसरातील नागरिकांना हा धोका सहन करावा लागत असून शेकडो एकर शेतातील पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे या राखेचे प्रदूषण रोखणे हे महाजेनको प्रशासन आणि वैज्ञानिकांसमोरही आव्हान ठरले होते. नीरीच्या वैज्ञानिकांनी राखेचे प्रदूषण नियंत्रित करण्याचा यशस्वी मार्ग शोधला आहे. सीएसआयआर-नीरीचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. लाल सिंग यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या टीमने २०१३ पासून हा प्रयोग सुरू केला, जो आज यशस्वी ठरला आहे.

विशेष बॅक्टेरिया व फन्जॉयचा वापर

कोराडी व खापरखेडा विद्युत केंद्रातून दररोज १६ ते १७ हजार टन कोळसा जाळला जातो व त्याच्या ज्वलनातून हजारो टन राख बाहेर पडते. कोराडीच्या ९० एकरात व खापरखेड्याच्या ४४२ एकरामध्ये राखेचे ढिगारे पसरलेले आहेत. डॉ. लाल सिंग यांच्या टीमने कोराडी मंदिरासमोर ३० एकर व कोराडी तलावाजवळ ३० एकर, आणि खापरखेडामध्ये ४० एकरात पसरलेल्या राखेत खड्डे तयार करून त्यात ईआरटी तंत्रज्ञानासह विशेष बॅक्टेरिया व फन्जाॅय टाकून हजाराे कमर्शियल बांबूंची लागवड केली. आज या दाेन्ही ठिकाणी बांबूवन बहरले आहे. डाॅ. लाल सिंग यांनी हिंगणघाटमध्ये ४० एकरात २८ हजार बांबूंची यशस्वी लागवड केली. यामुळे वेना नदीच्या प्रवाहात वाहून जाणारी शेतकऱ्यांच्या शेतातील सुपीक माती वाहून जाणे थांबले. डाॅ. लाल सिंग यांनी हिंगणघाटमध्ये ४० एकरात २८ हजार बांबूंची यशस्वी लागवड केली. यामुळे वेणा नदीच्या प्रवाहात वाहून जाणारी शेतकऱ्यांच्या शेतातील सुपीक माती वाहून जाणे थांबले.

- काेराडी, खापरखेड्यात ५३२ एकरात फ्लाय ॲशचे ढिगारे

- विदर्भात १२००० एकरात फ्लाय ॲश पसरलेली.

- भारतात ६५००० एकर भूमी फ्लाय ॲशच्या विळख्यात.

- ईआरटी तंत्रज्ञानाद्वारे बांबू लागवडीसाठी पीट तयार करून त्यात बॅक्टेरिया व फन्जाॅयचा वापर.

- पीटमध्ये ट्रिटमेंट. बांबूची वाढ दुपटीने.

- १० एकरासाठी २० याप्रमाणे गावातील २००० महिलांना प्रत्यक्ष राेजगार मिळाला.

- राखेमुळे हाेणारे वायुप्रदूषण, जलप्रदूषण राेखण्यात यश.

- जमिनीची सुपिकता शाबूत. आसपासच्या शेकडाे एकरातील पिकेही सुरक्षित.

Web Title: Bamboo forest blooms on the ashes of the power plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.