पतंगबाजीवर बंदी घाला, पतंग महाेत्सव घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:25 AM2021-01-08T04:25:39+5:302021-01-08T04:25:39+5:30

नागपूर : शहरात पतंग उडविण्यावर बंदी घालून सामूहिक पतंग महाेत्सवाचे आयाेजन करण्यात यावे, अशी मागणी श्री गुरुदेव युवा मंचतर्फे ...

Ban kite flying, have a kite festival! | पतंगबाजीवर बंदी घाला, पतंग महाेत्सव घ्या !

पतंगबाजीवर बंदी घाला, पतंग महाेत्सव घ्या !

Next

नागपूर : शहरात पतंग उडविण्यावर बंदी घालून सामूहिक पतंग महाेत्सवाचे आयाेजन करण्यात यावे, अशी मागणी श्री गुरुदेव युवा मंचतर्फे करण्यात आली आहे.

नागपूर शहराची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. शिवाय शहराची रचनाही विस्कळीत असून खेळाची माेठी मैदाने दिसेनाशी झाली आहेत. दरवर्षी पतंगाच्या मांजामुळे काहींचे बळी जातात तर अनेकजण गंभीर जखमी हाेतात. पतंग उडवित किंवा रस्त्यावर, छतावरून पतंगाच्या मागे धावताना अपघात घडून अनेकजण प्राण गमावतात व जखमी हाेतात. याशिवाय दरवर्षी नायलाॅन मांजामुळे शेकडाे निष्पाप पक्ष्यांचाही बळी जाताे. नायलाॅन मांजावर बंदी घालूनही छुप्या मार्गाने त्याची विक्री हाेते व खरेदी करून पतंग उडविण्यासाठी सर्रास वापरही हाेताे. त्यामुळे शहरात पतंग उडविण्यावरच सरसकट बंदी घालण्यात यावी, अशी मागणी श्री गुरुदेव मंचचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक यांनी केली आहे.

आपल्या देशातील अनेक राज्यांमध्ये सामूहिक पतंग महाेत्सव, पतंग स्पर्धा माेठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुजरातमध्ये तर याला उत्सवाचे स्वरूप असून विदेशातही ते पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. ही बाब लक्षात घेत शहराबाहेर विस्तीर्ण जागेत सामाजिक संघटनांच्या माध्यमातून विविध ठिकाणी पतंग महोत्सवाचे आयाेजन केल्यास ताे अधिक उत्साहवर्धक ठरेल, असे मत रक्षक यांनी व्यक्त केले. याबाबत त्यांनी महापाैर आणि मनपा प्रशासनाला निवेदन सादर केले.

Web Title: Ban kite flying, have a kite festival!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.