‘पॉर्नोग्राफिक फिल्म्स’वर बंदी आणावी : कैलास सत्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 08:39 PM2018-10-19T20:39:25+5:302018-10-19T20:41:35+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात मुख्य अतिथी म्हणून सहभागी झालेले बालअधिकार कार्यकर्ते व नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी देशातील महिला-मुलींवर होणाऱ्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली. आधुनिक काळात व्हर्चुअल रिअॅलिटी वेगाने वाढते आहे. ‘पॉर्नोग्राफिक फिल्म्स’वर कायदेशीर बंदी आणली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात मुख्य अतिथी म्हणून सहभागी झालेले बालअधिकार कार्यकर्ते व नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी देशातील महिला-मुलींवर होणाऱ्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली. आधुनिक काळात व्हर्चुअल रिअॅलिटी वेगाने वाढते आहे. ‘पॉर्नोग्राफिक फिल्म्स’वर कायदेशीर बंदी आणली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
देशात मुलींची जनावरांहून कमी किमतीत खरेदी विक्री होते ही दुर्दैवाची बाब आहे. संवेदनशील, समावेशी, सुरक्षित, स्वावलंबी, स्वाभिमानी भारताच्या निर्माणाचे सामर्थ्य पाहतो. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे भविष्यात शिक्षक, डॉक्टर, यांची भूमिका नाममात्र होईल की काय अशी भीती वाटते आहे. समाज सुरक्षा, वातावरण, विश्वास यांच्याशिवाय राष्ट्र निर्माण शक्य नाही. सीमा सुरक्षेसोबतच अंतर्गत सुरक्षा महत्त्वाची आहे . आपली मुले, महिला घरी, शाळा, सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित नाहीत. हा भारत मातेचा अपमान आहे . मौन बाळगणे एक प्रकारे हिंसाच असते, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. तरुणाईने आलोचक न बनता सांस्कृतिक शक्ती ओळखली पाहिजे. संघाने भारताचे वर्तमान व भविष्य वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले.