पीओपी मूर्ती खरेदी-विक्रीवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:12 AM2021-09-04T04:12:34+5:302021-09-04T04:12:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात पीओपी मूर्ती खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. पीओपी मूर्तीची विक्री करताना कुणी आढळून ...

Ban on sale and purchase of POP idols | पीओपी मूर्ती खरेदी-विक्रीवर बंदी

पीओपी मूर्ती खरेदी-विक्रीवर बंदी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरात पीओपी मूर्ती खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. पीओपी मूर्तीची विक्री करताना कुणी आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच मूर्ती जप्त केल्या जातील. यासोबतच शहरातील सर्व तलावांवर गणेशमूर्ती विसर्जनावर रोख लावण्यात आली आहे. विसर्जनासाठी शहरात कृत्रिम टँक बनवण्यात येतील. यंदा २५० कृत्रिम टँक उभारण्याची योजना आहे.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेश भगत यांनी ३ सप्टेंबर रोजी मूर्ती विक्री व विसर्जनासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. गणेशोत्सवाच्या तयारीसंदर्भात महापौर दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत बैठकही पार पडली. त्यानंतर मनपा प्रशासनाकडून आदेश जारी करण्यात आले.

घनकचरा व्यवस्थापन विभागाने गणेशोत्सवास पर्यावरणपूरक बनवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. प्रत्येक झोनमध्ये गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बनवण्यात येतील. सार्वजनिक व घरगुती मूर्तींचे यात विसर्जन केले जाईल. निर्माल्य गोळा करण्याची जबाबदारी कचरा एजन्सींना देण्यात आली आहे. पीओपी मूर्तींवर प्रतिबंधासह गणेशमूर्तीची सजावट करण्यासाठी प्लास्टिक व थर्माकोलच्या वापरावरही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मनपाने एनडीएसला कारवाईचे अधिकार दिले आहेत. तसेच मातीच्या गणेशमूर्तीचे घरीच विसर्जन करावे, असे आवाहनही मनपाने केले आहे.

-बॉक्स

सर्वाधिक कारवाई करणाऱ्यास पुरस्कार

पीओपी मूर्तीच्या खरेदी-विक्री व आयातीवर रोख लावण्यात आली आहे. अशा परिस्थितीत संबंधित मूर्तींची खरेदी-विक्री बेकायदेशीर आहे. त्यामुळे कुठेही पीओपी मूर्तींची स्थापना व्हायला नको. मनपातर्फे कारवाई केली जाईल. ज्या झोनमध्ये सर्वाधिक कारवाई होईल, त्या झोनला पुरस्कृत केले जाईल. कारवाई करणाऱ्या टॉप-३ झाेनला पुरस्कार दिले जातील.

- जनजागृती करणाऱ्या मंडळांना पुरस्कार

गणेशोत्सवांतर्गत जागरूकता निर्माण करणाऱ्या सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळांना सन्मानित करण्याची योजना मनपाने आखली आहे. डेंग्यू, कोविड याबाबत जनजागृती करणाऱ्यांनाा मनपातर्फे पुरस्कृत केले जाईल.

Web Title: Ban on sale and purchase of POP idols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.