पारशिवनी येथील आठवडी बाजारावरील बंदी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:11 AM2021-06-16T04:11:54+5:302021-06-16T04:11:54+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : शासनाने ‘लाॅकडाऊन’ शिथिल केल्याने नागरिकांची रस्त्यांवरील वर्दळ व बाजारपेठेतील गर्दी वाढली आहे. काेराेना संक्रमण ...

Ban on weekly market at Parshivani maintained | पारशिवनी येथील आठवडी बाजारावरील बंदी कायम

पारशिवनी येथील आठवडी बाजारावरील बंदी कायम

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

पारशिवनी : शासनाने ‘लाॅकडाऊन’ शिथिल केल्याने नागरिकांची रस्त्यांवरील वर्दळ व बाजारपेठेतील गर्दी वाढली आहे. काेराेना संक्रमण पूर्णपणे नाहीसे न झाल्याने ही गर्दी काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडू शकते. त्यामुळे पारशिवनी येथील आठवडी बाजारावरील बंदी कायम ठेवण्याचा, तसेच शहरातील बाजारपेठ रविवारी सुरू ठेवण्याचा निर्णय तालुका आढावा समितीने घेतला आहे. या निर्णयामुळे पारशिवनी शहरात साेमवारी (दि. १४) आठवडी बाजार भरला नव्हता.

पारशिवनी शहरात दर साेमवारी माेठा आठवडी बाजार भरताे. या बाजारात नागपूर, कन्हान, कामठी, खापा, सावनेर, रामटेक परिसरातील व्यापारी विक्रेते त्यांची दुकाने थाटतात, तर पारशिवनी शहरासह परिसरातील अनेक गावांमधील नागरिक, शेतकरी, मजूर व कामगार जीवनावश्यक व गृहाेपयाेगी साहित्य खरेदी करण्यासाठी येतात. नागपूर जिल्ह्यातील काेराेना संक्रमण कमी हाेताच शासनाने जिल्ह्यातील लाॅकडाऊन शिथिल केले. त्यामुळे काही शहरांसह ग्रामीण भागात आठवडी बाजार भरायला सुरुवात झाली आहे.

खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करीत असून, बहुतांश नागरिक काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे नागरिकांचा हा हलगर्जीपणा काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडण्याची आणि पारशिवनी शहरासह ग्रामीण भागात काेराेना संक्रमण पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील आठवडी बाजारावर काही काळासाठी घातलेली बंदी पुढेही काही दिवस कायम राहणार आहे. नागरिकांच्या साेयीसाठी बाजारपेठेतील सर्व दुकाने साेमवार वगळता इतर दिवस सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. साेमवारी शहरातील आठवडी बाजारासह सर्व दुकाने बंद राहणार आहेत, अशी माहिती तालुका आढावा समितीच्या सदस्यांनी दिली.

...

पारशिवनी शहर काेराेनामुक्त

पारशिवनी शहरात राेज काेराेनाच्या टेस्ट केल्या जात असून, शहरात काही दिवसांपासून काेराेनाचा एकही रुग्ण आढळून येत नाही. शहरात पुन्हा काेराेना संक्रमण वाढू नये, यासाठी महसूल, आराेग्य व नगर पंचायत विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्नरत आहेत. मध्यंतरी शहरात काेविड केअर सेंटरही सुरू करण्यात आले हाेते. दुसरीकडे, आठवडी बाजार सुरू करण्यात यावा, अशी मागणी पारशिवनी शहरातील काही व्यापाऱ्यांनी केली आहे.

Web Title: Ban on weekly market at Parshivani maintained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.