गणेश उत्सवात दणक्यात वाजतोय बँड पथकाचा दणदणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:44 AM2019-09-03T00:44:24+5:302019-09-03T00:46:07+5:30

गणेशाच्या आगमन आणि विसर्जनानिमित्त करण्यात येणाऱ्या दणदणाटाचा व्यवसाय कोट्यवधीच्या घरात जातोय. बॅण्डपथक, ढोलताशा पथक, धुमाल पार्टी, संदलवाल्यांच्या तारखा बुक आहे.

The band squad sounded at the Ganesh festival | गणेश उत्सवात दणक्यात वाजतोय बँड पथकाचा दणदणाट

गणेश उत्सवात दणक्यात वाजतोय बँड पथकाचा दणदणाट

Next
ठळक मुद्देआगमन आणि विसर्जनाच्या तारखा बुक : यवतमाळ वायगाववरूनही आली पथके

 लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : भारतीय संस्कृतीत कुठलाही सणउत्सव दणक्यात साजरा करण्याची परंपरा आहे. त्यात गणेश उत्सव हा उत्साहाची पर्वणीच आहे. गणेशाच्या आगमन आणि विसर्जनानिमित्त करण्यात येणाऱ्या दणदणाटाचा व्यवसाय कोट्यवधीच्या घरात जातोय. बॅण्डपथक, ढोलताशा पथक, धुमाल पार्टी, संदलवाल्यांच्या तारखा बुक आहे. एवढेच काय तर या दणदणाटात आणखी भर घालण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातून बाबुळगावचे प्रसिद्ध बॅण्डपथक, वायगावचे ढोलताशा पथक नागपुरात आले आहे.
एकेकाळी मोठमोठ्या गणेश उत्सव मंडळाच्या मिरवणुका ब्रास बॅण्डचे पथकाच्या तालबद्ध वादनाने निघायच्या. पण आज प्रत्येक गणेश उत्सव मंडळ आगमन आणि विसर्जनाची मिरवणूक वाजतगाजत काढते. सार्वजनिक गणेश मंडळाची शहरात वाढलेली संख्या लक्षात घेता, ब्रास बॅण्ड मंडळांना मिरवणुकीत वाजविणे शक्य नाही. ब्रास बॅण्डसाठी खर्चही जास्त असल्याने प्रत्येक मंडळ ब्रास बॅण्ड लावू शकत नाही. त्यामुळे संदल, धुमाल पार्टी, ढोलताशा पथक यांची मंडळाकडून मोठ्या संख्येने मागणी आहे. गणपती उत्सवात मंडळच नाही, तर काही घरगुती गणपतींचे या वाद्यांच्या साथीने आगमन होते. त्यामुळे गणेश उत्सवात ही बॅण्ड पथक अतिशय व्यस्त आहे. नागपूरची चितारओळ ही मध्यभारतातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. नागपूर जिल्ह्यासह मध्य प्रदेशातही येथून गणरायाच्या मूर्ती जातात. गणपतीच्या आगमनाचे दिवस मंडळांची संख्या लक्षात घेता यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगावच्या ४० ते ५० युवकांचे बॅण्डपथक नागपुरात दाखल होते. त्याचबरोबर वायगावहूनही युवकांचे पथक येथे येते. बाहेरगावाहून येणाºया बॅण्ड पथकालाही चांगलीच मागणी असते. आगमनाचे सलग दोन दिवस हे पथक नागपुरात असतात. त्याचबरोबर शिवसंस्कृती ढोलताशा पथकांची गेल्या काही वर्षात नवीन परंपरा सुरू झाली आहे. ६० ते ७० युवक युवतींचा एक समुह भगवे फेटे बांधून, हातात भगवा घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने वादन करतात. या पथकांची मोठमोठ्या मंडळाकडून मागणी होत आहे.

Web Title: The band squad sounded at the Ganesh festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.