बाेंडअळी नियंत्रण कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:09 AM2021-03-01T04:09:45+5:302021-03-01T04:09:45+5:30
बेला : केंद्रीय कापूस संशाेधन संस्था, नागपूर व तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उमरेड यांच्या संयुक्त विद्यामाने चारगाव (ता. उमरेड) ...
बेला : केंद्रीय कापूस संशाेधन संस्था, नागपूर व तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उमरेड यांच्या संयुक्त विद्यामाने चारगाव (ता. उमरेड) येथे कपाशीवरील गुलाबी बाेंडअळी व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांच्या कार्यशाळेचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते. यात आयएमपीबीडब्ल्यू प्रकल्पांतर्गत चर्चासत्रही घेण्यात आले.
उद्घाटन केंद्रीय कापूस संशाेधन संस्थेचे संचालक डाॅ. वाय. जी. प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डाॅ. एस. एन. राेकडे, कीटकशास्र विभागप्रमुख डाॅ. नंदिनी गाेकटे, शास्रज्ञ डाॅ. व्ही. एस. नगरारे, डाॅ. एस. एम. वासनिक, डाॅ. बी. बी. फंड, डाॅ. दीपक नगराळे, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे उपस्थित हाेते. डाॅ. प्रसाद यांनी सामूहिक प्रयत्नातून गुलाबी बाेंडअळी व्यवस्थापन, डाॅ. राेकडे यांनी शेतीला पूरक जाेडधंदे, डाॅ. वासनिक यांनी ई-कापूस, संजय वाकडे यांनी शासनाच्या शेतीविषयक याेजना, डाॅ. नगरारे यांनी कपाशीवरील प्रमुख किडींचे व्यवस्थापन, डॉ. दीपक नगराळे यांनी कपाशीवरील बाेंडसड, डाॅ. फंड यांनी हंगाम पश्चात गुलाबी बाेंडअळीचे व्यवस्थापन यावर विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यशाळेला आयआरपीबीडब्ल्यूचे नागपूर जिल्हा संचालक डाॅ. एस. एस. पाटील, वरिष्ठ संशाेधक कमलाकर चापले, अभिषेक पातूरकर यांच्यासह चारगाव व मुरादपूर येथील कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित हाेते.