नागपुरात एटीएममध्ये ठणठणाट : बँकांना आठवड्यात चार दिवस सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:31 AM2018-11-11T00:31:43+5:302018-11-11T00:32:46+5:30

चालू सप्ताहात शुक्रवार वगळता बँकांना चार दिवस सुट्या असल्यामुळे एटीएममध्ये ठणठणाट असून नागरिकांना आर्थिक टंचाई जाणवत आहे.

Bank ATMs in Nagpur dry: Banks vacation 4 days in a week | नागपुरात एटीएममध्ये ठणठणाट : बँकांना आठवड्यात चार दिवस सुटी

नागपुरात एटीएममध्ये ठणठणाट : बँकांना आठवड्यात चार दिवस सुटी

Next
ठळक मुद्देनागरिकांची गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चालू सप्ताहात शुक्रवार वगळता बँकांना चार दिवस सुट्या असल्यामुळे एटीएममध्ये ठणठणाट असून नागरिकांना आर्थिक टंचाई जाणवत आहे.
बुधवारी लक्ष्मीपूजन आणि गुरुवारी भाऊबीजमुळे बँकांना सुटी होती. शुक्रवारी बँकांचे कामकाज झाले. त्यानंतर दुसरा शनिवार आणि रविवारमुळे बँका बंद होत्या. अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सुटी घेऊन सलग पाच दिवस आनंद घेतला. सर्वच बँकांनी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर करन्सी चेस्टला एटीएममध्ये दोन दिवसांची रक्कम टाकण्यास सांगितले होते. पण बुधवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनेकांनी आपली आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी एटीएमकडे धाव घेतल्यामुळे अनेक बँकांच्या एटीएममधील रक्कम बुधवारी दुपारीच संपली. त्याचा फटका दिवाळी साजरी करणाऱ्यांना झाला. याशिवाय शनिवारीही सर्वच राष्ट्रीयकृत बँकांच्या अर्ध्यांपेक्षा जास्त एटीएमध्ये ठणठणाट होता. सोमवारी सकाळी बँकेकडून रक्कम आल्यानंतरच एटीएम सुरू होईल, असे सुरक्षा रक्षक सांगत होते.
सदर प्रतिनिधीने सीताबर्डी, धंतोली, रेशीमबाग, नंदनवन, सक्करदरा या भागातील एटीएमची पाहणी केली असता बºयाच एटीएम बाहेर ‘नो कॅश’चे बोर्ड झळकत होते. अनेक बँकांच्या एटीएमध्ये शुक्रवारी रक्कम पोहोचली नाही. काही एटीएममध्ये रक्कम होती. मात्र, त्यात दुसऱ्या बँकांचे कार्ड स्वीकारले जात नसल्यामुळे अनेकांची गैरसोय झाली. बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना ‘रिकाम्या एटीएम’चा मोठा फटका बसला. गड्डीगोदाम चौक, कडबी चौक, जरीपटका, सीताबर्डीसह अनेक भागातील एटीएमसमोर गर्दी होती.

 

Web Title: Bank ATMs in Nagpur dry: Banks vacation 4 days in a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.