नागपुरात बँक कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी : कोट्यवधींचे व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 12:33 AM2020-02-02T00:33:30+5:302020-02-02T00:34:49+5:30
: राष्ट्रीयीकृत बँकेच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी सर्व शाखांमध्ये कामकाज ठप्प होते. कोट्यवधींचे व्यवहार झाले नाहीत. शनिवारी बहुतांश बँकांचे एटीएम रिक्त झाल्याने ग्राहकांची गैरसोय झाली. बँकेचे कामकाज सोमवारी सुरू होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीयीकृत बँकेच्यासंपाच्या दुसऱ्या दिवशी सर्व शाखांमध्ये कामकाज ठप्प होते. कोट्यवधींचे व्यवहार झाले नाहीत. शनिवारी बहुतांश बँकांचे एटीएम रिक्त झाल्याने ग्राहकांची गैरसोय झाली. बँकेचे कामकाज सोमवारी सुरू होणार आहे.
शनिवारी सकाळी यूएफबीएच्या नेतृत्वात बँकेच्या नऊ संघटनांचे कर्मचारी आणि अधिकारी सकाळी १०.३० वाजता किंग्जवे रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियासमोर गोळा झाले आणि विविध प्रलंबित मागण्यासाठी नारे-निदर्शने केली. यूएफबीए नागपूर चॅप्टरचे सुरेश बोभाटे आणि संयोजक सुभाष समदेकर यांनी सभेला संबोधित केले. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन पुढेही सुरू राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला. आयबीए आणि सरकारच्या धोरणामुळे संघटना आंदोलन करण्यास विवश असल्याचे बोभाटे म्हणाले.
सभेनंतर प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. हे निवेदन वरिष्ठांकडे सादर करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी विविध संघटनांचे नेते व्ही.व्ही. असई, नागेश डांडे, दिनेश मेश्राम, विजय मेश्राम, कमल रंगवानी, विक्की दहीकर, नितीन बोरवकर, जयवंत गुरवे, चेंदिल अय्यर, कपिल सवाईकर, वजीर मेश्राम, माधव पोफळी, रत्ना धोरे, प्रणाली बोरकर, सुनीता पाल, पूजा रामटेके, उमा लोया, पुरवा तातावार, वैशाली घोडेस्वार, प्रिया नागरे, अनघा जाद, हेमलता दिवाण, सुनिता तिवारी, प्रियंका तिवारी, प्रदीप केलारी, जगदेव गोलायत, सत्यप्रकाश तिवारी, अशोक अटारे, बबलू कोल्हे, एल.पी. नंदनवार, रवी जोशी, चंद्रकांत वैद्य आणि कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.