कर्ज घेऊन बँकेला तीन कोटींचा चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 09:01 PM2019-06-12T21:01:48+5:302019-06-12T21:05:36+5:30

बोगस दस्तावेजाच्या आधारावर एका मोबाईल व्यापाऱ्याने सात बँक अधिकाऱ्यांच्या मदतीने बँक ऑफ बडोदाला तीन कोटी रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

The bank fraud by three crores after taking loan | कर्ज घेऊन बँकेला तीन कोटींचा चुना

कर्ज घेऊन बँकेला तीन कोटींचा चुना

googlenewsNext
ठळक मुद्देनागपुरातील मोबाईल व्यापाऱ्यासह सहा अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बोगस दस्तावेजाच्या आधारावर एका मोबाईल व्यापाऱ्याने सात बँक अधिकाऱ्यांच्या मदतीने बँक ऑफ बडोदाला तीन कोटी रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मोबाईल व्यवसायिक संजय मोटूमल कुकरेजा (४४) रा. देव एनक्लेव कुशीनगर, महेश उदरनमल भटेजा (४१) रा. कुशीनगर, अजय गंगाधर सुटे (४१) धाडीवाल ले-आऊट, वामन हेडाऊ (६१) वाडी, ध्रितेश सुनील मन्ना (३२) रा. सिडको औरंगाबाद, रमेश चंद्रभान लांबाहाते (५३) अयोध्यानगर, राजेश महावीरप्रसाद खरे (६३) रा. अभ्यंकरनगर आणि विजय रामचंद्र पेटकर (५४) रा. दयालू सोसायटी जरीपटका अशी आरोपींची नावे आहे.
संजय मोटुमल कुकरेजा याचे सीताबर्डी येथे मोबाईल शॉपी आहे. कुकरेजाला व्यापारासाठी कर्जाची गरज होती. कामठी रोडवर त्याची जमीन आहे. कृषी जमीन असल्यामुळे कुकरेजा यांना बँकेतून मोठे कर्ज मिळू शकत नव्हते. त्यामुळे कुकरेजाने ही जमीन अकृष (एनए) असल्याचे बोगस दस्तावेज तयार केले. या दस्तावेजाच्या आधारावर २०१३ मध्ये बँक ऑफ बडोदाच्या अनंतनगर शाखेत कर्जासाठी अर्ज सादर केला. कुकरेजाचे बँकेतील अधिकाऱ्यांशी संगनमत होते. त्यामुळे त्यांनी एनएची तपासणी केली नाही. कर्जाच्या दस्तावेजावर गँरेंटर म्हणून महेश भटेजाने स्वाक्षरी केली. बँकेच्या अधिकाऱ्याने दस्तावेजाची कुठलीही चौकशी न करता कर्ज मंजूर केले. कुकरेजाने काही महिने कर्जाची बरोबर किस्त भरली. परंतु नंतर मात्र किस्त भरणे बंद केले. अनेक महिने किस्त न भरल्यावर बँकेने किस्त भरण्याची नोटीस बजावली. परंतु त्यानंतरही कुकरेजाने कुठलेही पाऊल न उचलल्यामुळे बँकेने कुकुरेजाच्या दस्तावेजांची चौकशी केली. तेव्हा एनए प्रमाणपत्र बोगस असल्याचे आढळून आले. कुकरेजाला कर्ज मंजूर करणाऱ्या बहुतांश बँक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. बँकेचे सध्याचे शाखा व्यवस्थापक राजू अमरू यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. तपासानंतर गिट्टीखदान पोलीस ठाण्यात कुकरेजा व इतर लोकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The bank fraud by three crores after taking loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.