बँक ऑफ इंडियाने कमविला २५० कोटी नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:08 AM2021-06-16T04:08:57+5:302021-06-16T04:08:57+5:30
नागपूर : बँक ऑफ इंडियाने ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत २५० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमविला आहे. ...
नागपूर : बँक ऑफ इंडियाने ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत २५० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमविला आहे. एक वर्षापूर्वी याच कालावधीत बँकेला ३५७१.४१ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. डिसेंबर २०२०-२१ ला समाप्त झालेल्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा ५४०.७२ कोटींपेक्षा कमी असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत १२२१५.७८ कोटी रुपयांच्या तुलनेत मार्च २०२०-२१ च्या तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न ११३७९.८४ कोटी रुपये होते. सन २०२०-२१ मध्ये बँकेला २१६०.३० कोटी रुपये निव्वळ नफा झाला आहे. यापूर्वी मागील वर्षी बँकेला २९५६.८९ कोटींचे नुकसान झाले होते. २०२०-२१ मध्ये बँकेचे उत्पन्न कमी होऊन ४८०४०.९३ कोटी रुपये झाले. वर्षभरापूर्वी बँकेने ४९०६६.३३ कोटी रुपये कमविले होते. एनपीएच्या प्रकरणात सुधारणा झाली आहे. मार्च २०२१ संपल्यानंतर बँकेचा ग्रॉस एनपीए १३.७७ टक्के राहिला. परंतु मागील वर्षी बँकेचा ग्रॉस एनपीए १४.७८ टक्के होता, तर ग्रॉस बॅड लोन्स ६१५४९.९३ कोटी रुपयांवरून कमी होऊन ५६५३४.९४ कोटी रुपये राहिले. नेट एनपीए किंवा बॅड लोन्समध्येही ३.३५ टक्के घसरण झाली. पूर्वी ही ३.८८ टक्के (१४३२०.१० कोटी रुपये) होती, अशी माहिती नागपूर झोनचे झोनल व्यवस्थापक संतोष एस. यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. (वा. प्र.)
............