बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:07 AM2021-06-30T04:07:21+5:302021-06-30T04:07:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकांमधून कर्ज उचलून एका टोळीने दोन बँकांना १.१० कोटींचा गंडा घातला. ...

Bank robbery on the basis of fake documents | बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकांना गंडा

बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकांना गंडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकांमधून कर्ज उचलून एका टोळीने दोन बँकांना १.१० कोटींचा गंडा घातला. प्रकरण उजेडात आल्यानंतर बेलतरोडी पोलिसांनी या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करून टोळीचा म्होरक्या राकेश उदयराज गुप्ता आणि त्याचा साथीदार ईमरान अली या दोघांना अटक केली.

आरोपी गुप्ताच्या टोळीत त्याची पत्नी स्वाती (वय ३२, रा. गोधनी मार्ग), ईमरान अली हाशमी (वय ४२, रा. राजीवनगर), दीपक गजानन बिसने (वय ३२, रा. म्हाडा कॉलनी, कळमना) आणि एका महिलेचा समावेश आहे. ही टोळी कुणाच्याही मालमत्तेची बनावट कागदपत्रे तयार करण्यात सराईत आहे. त्यांनी २८ मे २०१९ ला सोमलवाड्यातील श्री गुरुछाया को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील भूखंडधारक प्रमिला नागदेवे यांच्या मालमत्तेची बनावट कागदपत्रे तयार केली. त्यांच्या नावाने दुसऱ्याच एका महिलेला निबंधक कार्यालयात हजर करून प्रमिला नागदेवे यांच्या भूखंडांची दोन वेळा विक्री करून घेतली. हे बनावट विक्रीपत्र कर्नाटक बँकेच्या मनीषनगर शाखेत सादर करून त्याआधारे ५१ लाखांचे कर्ज मंजूर करून घेतले. त्यातील ३० लाख, ३७ हजारांची रोकड त्यांनी उचलली. नंतर हेच कागदपत्र सारस्वत बँकेच्या अजनी शाखेत तारण ठेवून तेथून ६० लाखांचे कर्ज मंजूर करून घेतले. त्यातील ४० लाखांची रोकड उचचली. अशा प्रकारे दोन बँकांमध्ये एकाच मालमत्तेची बनावट कागदपत्रे सादर करून आरोपींनी १ कोटी, ११ लाखांचे कर्ज मंजूर केले आणि त्यातील ७० लाख, ३७ हजारांची रोकड उचलली. दोन्ही बँकांकडे कर्जाची परतफेड थकविल्याने बँकांनी चाैकशी सुरू केली असता ती कागदपत्रे बनावट असल्याचे आणि आरोपींचा त्या मालमत्तेशी कवडीचा संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कर्नाटक बँकेचे व्यवस्थापक प्रशांत सूर्यकांत राऊत (वय ३७, रा. श्री समर्थ स्वामी नगरी, बेसा) यांनी बेलतरोडी ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार विजय आकोत यांनी आपल्या सहकाऱ्यांकडून चाैकशी करून घेतल्यानंतर या प्रकरणात उपरोक्त टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा सूत्रधार राकेश गुप्ता आणि ईमरान हाशमीला अटक करून त्यांचा पोलिसांनी २ जुलैपर्यंत पीसीआर मिळवला.

---

बँक अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद

या प्ररकणात बँक अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे. एकाच मालमत्तेची दोन वेगवेगळ्या बँकांना तारण म्हणून कागदपत्रे सादर केल्यानंतर कोणत्याच बँक अधिकाऱ्याला कागदपत्रांची तपासणी आणि खरेखोटेपणा जाणून घेण्याची गरज का भासली नाही. त्यांना एक वर्षानंतर कशी जाग आली, तेदेखील कळायला मार्ग नाही.

----

म्होरक्या विकायचा शेंगा

या टोळीचा म्होरक्या काही वर्षांपूर्वी हातठेल्यावर मुंगफली विकायचा. आता त्याची कोट्यवधींची मालमत्ता आहे. त्याच्या टोळीविरुद्ध सीताबर्डी, मानकापूर आणि जरीपटक्यातही गुन्हे दाखल असल्याचे समजते. तो आधी राकेश शाहू नावाने वावरायचा, आता मात्र राकेश गुप्ता नावाने वावरतो, अशीही सूत्रांची माहिती आहे.

---

Web Title: Bank robbery on the basis of fake documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.