कोरोनाच्या संकटात ‘बीएपीआयओ’चा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:07 AM2021-06-11T04:07:52+5:302021-06-11T04:07:52+5:30

नागपूर : कोरोनाच्या रुग्णांच्या उपचारात मदत व्हावी, त्यांचा जीव वाचावा यासाठी ‘द ब्रिटिश असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियन ओरिजन’ ...

BAPIO's helping hand in the Corona crisis | कोरोनाच्या संकटात ‘बीएपीआयओ’चा मदतीचा हात

कोरोनाच्या संकटात ‘बीएपीआयओ’चा मदतीचा हात

Next

नागपूर : कोरोनाच्या रुग्णांच्या उपचारात मदत व्हावी, त्यांचा जीव वाचावा यासाठी ‘द ब्रिटिश असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियन ओरिजन’ (बीएपीआयओ) या मूळ भारतीय असलेल्या ब्रिटनमधील डॉक्टरांनी चार कोटींच्या उपकरणाची मदत केली आहे. सोबतच नागपुरातील रुग्णाला ब्रिटनमधून पाहणी करून त्याच्यावर उपचाराबाबत मार्गदर्शन सेवासुद्धा हाती घेतली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळ व उपकरणाची चणचण प्रकर्षाने पुढे आली आहे. यात ‘बीएपीआयओ’चा मदतीचा हात कोरोना रुग्णांना उभारी देणारा ठरला आहे. ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे जवळपास ६५ हजार भारतीय डॉक्टर आहेत. ते सर्वच मदतीसाठी एकत्र आले आहेत. या संस्थेमार्फत भारतात १३० व्हेंटिलेटर्स, ३०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ५,००० पल्स ऑक्सिमीटर, पीपीई उपकरणे व औषधे पाठविण्यात आली आहेत. विदर्भात या वितरणाची जबाबदारी बालरोग तज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांच्याकडे दिली आहे. त्यांच्यासह किंग्जवे हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजीव खंडेलवाल हे सुद्धा सक्रिय आहेत. निमिष खंडेलवाल यांच्याकडे समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. हेमलकसा येथील डॉ. प्रकाश आमटे यांचा प्रकल्प, डॉ. अभय बंग यांचा गडचिरोलीतील प्रकल्प, वरोरा येथील आनंदवन यासह अन्य आवश्यकता असलेल्या ठिकाणी ब्रिटनमधून आलेली ही उपकरणे देण्यात येत असल्याचे डॉ. बोधनकर यांनी सांगितले. मूळ नागपूरकर असलले डॉ. रमेश मेहता हे ब्रिटनमधील भारतीय डॉक्टरांच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्या पुढाकाराने हा मदतीचा हात, सोबतच भारतात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आभासी पद्धतीने विनामूल्य सल्ला दिला जात आहे. लवकरच ग्रामीण भागातही अशाप्रकारची रुग्णसेवा ते सुरू करणार आहेत.

Web Title: BAPIO's helping hand in the Corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.