बरडे नगरला डेंग्यूचा डंख

By admin | Published: October 27, 2014 12:35 AM2014-10-27T00:35:07+5:302014-10-27T00:35:07+5:30

पश्चिम नागपुरातील बरडे नगर, एकता नगर भागात डेंग्यूची साथ पसरली आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. गत दोन महिन्यांपासून महापालिका प्रशासनाकडे सातत्याने तक्रार केल्यानंतर

Barda Nagarla dengue rancher | बरडे नगरला डेंग्यूचा डंख

बरडे नगरला डेंग्यूचा डंख

Next

रुग्णांची संख्या वाढतेय : प्रशासन मात्र गप्प
नागपूर : पश्चिम नागपुरातील बरडे नगर, एकता नगर भागात डेंग्यूची साथ पसरली आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. गत दोन महिन्यांपासून महापालिका प्रशासनाकडे सातत्याने तक्रार केल्यानंतर याकडे लक्ष दिले जात नसल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. महिनाभरापूर्वी एकता नगर परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. पालिका प्रशासन याची दखल घेत विशेष उपाययोजना करेल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. मात्र डेग्यूची साथ आता बरडे नगरात पसरली आहे.
या वस्तीत सध्या डेंग्यूचे पाच रुग्ण आहे. महापालिकेचे कर्मचारी केवळ चौकशी करतात मात्र स्वच्छतेसंदर्भात उपाययोजना करीत नाही.
यासोबतच ज्या रिकाम्या भूखंडात घाण केली जाते, त्या भूखंड मालकावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप बरडे नगर येथील नागरिकांनी केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Barda Nagarla dengue rancher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.