शेतमालाच्या आधारभूत किंमती लागू करण्यासाठी भाजपा किसान मोर्चाचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 06:06 PM2020-10-12T18:06:06+5:302020-10-12T18:06:06+5:30

सटाणा : केंद्र सरकारने आधारभूत किंमती जाहीर करूनही राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे शेतमाल लुट भावाने खरेदी केला जात आहे. राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकरी वाऱ्यावर असून राज्य सरकारने आधारभूत किंमती लागू करण्यासाठी तत्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदू शर्मा यांनीकेली आहे. याबाबत सोमवारी (दि.१२) तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

Basic prices of agricultural commodities apply | शेतमालाच्या आधारभूत किंमती लागू करण्यासाठी भाजपा किसान मोर्चाचे निवेदन

शेतमालाच्या आधारभूत किंमती लागू करण्यासाठी भाजपा किसान मोर्चाचे निवेदन

Next
ठळक मुद्देभुईमुग शेंगा ४६०० तेल १०० रु पये किलो ...

सटाणा : केंद्र सरकारने आधारभूत किंमती जाहीर करूनही राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे शेतमाल लुट भावाने खरेदी केला जात आहे. राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकरी वाऱ्यावर असून राज्य सरकारने आधारभूत किंमती लागू करण्यासाठी तत्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदू शर्मा यांनीकेली आहे. याबाबत सोमवारी (दि.१२) तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारने सर्वच शेतमालाच्या आधारभूत किंमती जाहीर केल्या. मक्याची आधारभूत किंमत प्रती क्विंटल १७५० रु पये असतांना राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये ७०० ते १२०० रु पयांपर्यंत सर्रासपणे मका लुट भावाने खरेदी केला जात आहे. यंदा मक्याचे पिक जोमात आहे. त्यामुळे राज्य सरकारने तत्काळ आधारभूत किंमती प्रमाणे मका खरेदी करावा जेणेकरून शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे पडतील. मात्र शासनाने तसे न करता बघ्याची भूमिका घेतली आहे. शासनाने याबाबत तत्काळ हस्तक्षेप करून आधारभूत किंमती लागू कराव्यात.याप्रसंगी सुधाकर पाटील, दादाजी सूर्यवंशी, मोठाभाऊ सोनवणे, संजय सूर्यवंशी, दावल काकुळते, संदीप कापडणीस, वसंत पगार, किशोर सूर्यवंशी, रतन देसले, प्रशांत देसले, रत्नाकर सोनवणे, दोधा देसले, रमेश पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.
भुईमुग शेंगा ४६०० तेल १०० रु पये किलो ...
सध्या भुईमुगचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आले आहे. केंद्र सरकारने भुईमुगला प्रती क्विंटल ५२७५ रु पये आधारभूत भाव जाहीर केला आहे. मात्र भुईमुगला बाजार समित्यांमध्ये सरासरी ४६०० रु पये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. हा अक्षरश: लुट भाव आहे. वास्तविक शेंगदाणा तेल १०० किलो भावाने विक्र ी होत असतांना शेंगा लुट भावाने खरेदी केल्या जात आहे.
 
Web Title: Basic prices of agricultural commodities apply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.