-तर संप ठरणार आरपारची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 01:29 AM2017-09-25T01:29:04+5:302017-09-25T01:29:29+5:30

तुटपुंजे वेतन देण्यात येत असल्यामुळे एसटी कामगारांचे आर्थिक शोषण होत आहे. त्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे.

-The battle of relations between the two ends | -तर संप ठरणार आरपारची लढाई

-तर संप ठरणार आरपारची लढाई

Next
ठळक मुद्देहनुमंत ताटे यांचे प्रतिपादन : एसटी कामगार संघटनेचा प्रादेशिक मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तुटपुंजे वेतन देण्यात येत असल्यामुळे एसटी कामगारांचे आर्थिक शोषण होत आहे. त्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. त्यामुळे एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी एसटी कामगारांचा बेमुदत संप १७ आॅक्टोबरपासून पुकारण्यात आला आहे. हा संप अपुºया वेतनात काम करणाºया एसटी कामगारांसाठी आरपारची लढाई ठरणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कामगार नेते आणि एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील एकमेव मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने रविवारी तुळशीबाग येथील राजे तेजसिंगराव भोसले सभागृहात आयोजित प्रादेशिक मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी विवेक पांढरकर होते. व्यासपीठावर विभागीय सचिव अजय हट्टेवार, एस. टी. बँकेचे संचालक सुभाष वंजारी, नागपूर विभाग अध्यक्ष शशी वानखेडे, कार्याध्यक्ष प्रज्ञाकर चंदनखेडे, कोषाध्यक्ष सुशील झाडे उपस्थित होते.
हनुमंत ताटे म्हणाले, एसटी प्रशासनाने सातव्या वेतन आयोगाच्या मुख्य मागणीला बगल दिल्यामुळे संपाशिवाय संघटनेकडे दुसरा पर्याय उरला नाही. संपाच्या बाजूने ९९ टक्के कामगारांनी मतदान केले आहे. जवळपास एक लाख एसटी कामगार या संपात सहभागी होणार आहेत. आजपर्यंत झाला नाही असा हा बेमुदत संप होणार असून कामगारांनी आर्थिक स्थैर्यासाठी संघटना-संघटना असा मतभेद बाजुला सारून संपात सहभागी होण्याची गरज आहे. २९ सप्टेंबरला संपाची कायदेशीर नोटीस देणार असल्याचे हनुमंत ताटे यांनी सांगितले. केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी एसटी कामगारांना शासन आणि प्रशासनाच्या कोणत्याही दडपशाहीला बळी न पडता संपात सहभागी होण्याचे आवाहन केले. केंद्रीय कार्याध्यक्ष सदाशिव शिवणकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्तविक विभागीय सचिव अजय हट्टेवार यांनी केले. संचालन राजू मुंडवाईक यांनी केले. आभार प्रदर्शन प्रशांत बोकडे यांनी मानले.
मेळाव्याला दत्ता बावणे, राजू करपते, सुनील पशीने, नत्थु तडस, प्रशांत निवल, अब्दुल कलाम, नरेंद्र भेलकर, मनोज बघले, दिलीप माहुरे, प्रदीप वाघ, सुधीर नांदगावे, किशोर शिंदे, गणेश मेश्राम, गजू शेंडे, रवी सोमकुवर, मो. आरिफ, अनिल मालोदे, एन. डी. गणेश, संदीप टेंभरे, महिला प्रतिनिधी मीना बोद्रे, अर्चना नांदने, निर्मला तिरपुडे, संगीता बोपचे यांच्यासह शेकडो कामगार उपस्थित होते.

Web Title: -The battle of relations between the two ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.