बावनकुळेंचे ‘कमबॅक’ की देशमुखांची ‘एन्ट्री’? नागपूर विधान परिषद निवडणुकीचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 06:45 AM2021-12-14T06:45:00+5:302021-12-14T06:45:01+5:30

Nagpur News विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी सुरू होत आहे. यात बावनकुळे की देशमुख वा भोयर याचा फैसला होईल.

Bavankule's 'comeback' or Deshmukh's 'entry'? Result of Legislative Council Election | बावनकुळेंचे ‘कमबॅक’ की देशमुखांची ‘एन्ट्री’? नागपूर विधान परिषद निवडणुकीचा निकाल

बावनकुळेंचे ‘कमबॅक’ की देशमुखांची ‘एन्ट्री’? नागपूर विधान परिषद निवडणुकीचा निकाल

Next

 

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी सुरू होणार आहे. दुपारपर्यंत निकालाचे नेमके चित्र आल्यावर भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचे ‘कमबॅक’ होते की कॉंग्रेसने ऐनवेळी समर्थन दिलेले मंगेश देशमुख यांचा मार्ग सुकर होतो हे स्पष्ट होईल. सोबतच भाजपमधून कॉंग्रेसमध्ये आलेले व ऐनवेळी कॉंग्रेसचा पाठिंबा गमावलेले रविंद्र भोयर किती मते घेतात याकडेदेखील राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे.

 मंगळवारी सकाळी ८ वाजता पासून मतमोजणी प्रक्रियेला जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे सुरुवात होईल. निवडणुकीत ९८.९३ टक्के मतदान झाले होते. मतमोजणीच्या वेळी वैध मतदानाच्या आधारावर कोटा निश्चित करण्यात येईल. ज्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची मते मिळून कोटा पूर्ण होईल तो उमेदवार विजयी घोषित करण्यात येईल. परंतु पहिल्या पसंतीची मते मिळून एकाही उमेदवाराने कोटा पूर्ण केला नाही. तर दुसऱ्या पसंतीक्रमाच्या आधारे मतमोजणी होईल. यात कोटा पूर्ण करणारा उमेदवार विजयी होईल. मतमोजणीच्या वेळी अगोदर अवैध मते शोधण्यात येतील. प्रथम पसंतीक्रम न दर्शविणे, पसंतीक्रम शब्दात नोंदविणे, चुकीच्या पध्दतीने क्रमांक लिहिणे, वेगळा पेन वापरणे इत्यादी कारणांमुळे मत अवैध ठरु शकते. मतमोजणीच्या सुरुवातीला २५-२५ चे गठ्ठे तयार करुन अवैध मते बाजूला करण्यात येणार आहे. ४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. सोमवारी निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे व जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विमला आर. यांनी बचत भवन येथे मतमोजणी प्रक्रियेचा आढावा घेतला.

भाजपला विजयाचा विश्वास, तर कॉंग्रेसचादेखील यशाचा दावा

मतमोजणीच्या पूर्वसंध्येला भाजप व कॉंग्रेस दोन्ही पक्षांकडून विजयाचा दावा करण्यात आला. मतदारांची संख्या जास्त असल्याने सुरुवातीपासूनच भाजपकडून विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात येत होता. बावनकुळे यांना चारशेहून अधिक मतं मिळतील, असा दावा करण्यात येत आहे. तर कॉंग्रेसच्या नेत्यांनी २८० च्या जवळपास मत मिळतील, अशी भूमिका मांडली आहे. ग्रामीण भागात भाजपच्या ४२ मतांना फोडण्यात यश आल्याचे मंत्री सुनील केदार यांचे समर्थक सांगत आहे. आता कॉंग्रेसला खरोखरच यश मिळते का, तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी किती सहकार्य केले हेदेखील निकालातून स्पष्ट होईल.

Web Title: Bavankule's 'comeback' or Deshmukh's 'entry'? Result of Legislative Council Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.