सायबर क्राईमपासून सतर्क राहा : ब्रिजेश सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:12 AM2017-12-21T00:12:48+5:302017-12-21T00:19:16+5:30

काळानुसार झपाट्याने स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यासोबतच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. एका छोट्या चुकीमुळे अनेक लोकांची खासगी माहिती सहजरीत्या हॅक होत आहे. त्यामुळे स्मार्ट फोनचा वापर करणाऱ्यांनी सतर्क राहिल्यास सायबर गुन्हे थांबविता येतील, असे मत राज्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले.

Be alert with cyber crime: Brijesh Singh | सायबर क्राईमपासून सतर्क राहा : ब्रिजेश सिंह

सायबर क्राईमपासून सतर्क राहा : ब्रिजेश सिंह

googlenewsNext
ठळक मुद्देअ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी माहिती मिळवासोशल नेटवर्किंग साईटचा वापर करताना सजग राहण्याची गरज

आॅनलाईन लोकमत
नागपूर : काळानुसार झपाट्याने स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यासोबतच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. एका छोट्या चुकीमुळे अनेक लोकांची खासगी माहिती सहजरीत्या हॅक होत आहे. त्यामुळे स्मार्ट फोनचा वापर करणाऱ्यांनी सतर्क राहिल्यास सायबर गुन्हे थांबविता येतील, असे मत राज्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले.
बुधवारी लोकमत भवनाला माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी सदिच्छा भेट देऊन संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी चर्चा करताना ते बोलत होते. उल्लेखनीय म्हणजे सिंह हे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी सांगितले की, सायबर गुन्हेगारांना कुणाचा डाटा किंवा खासगी माहिती हॅक करताना अधिक श्रम करावे लागत नाही. आज त्यांच्याजवळ असे अनेक तंत्र आहेत, ज्याच्या आधारे ते हॅकिंग करतात. त्यामुळे सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करताना यूझर नेम व पासवर्ड बनविताना विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे, परंतु असे होत नाही. सहजपणे आठवू शकतील असे यूझर नेम व पासवर्ड ठेवण्यात येतात. याच मानसिकतेचा फायदा हॅकर्स उचलतात. स्मार्ट फोनचा वापर करणारे त्यांच्या फोनवर आलेल्या अनेक सूचनांकडे दुर्लक्ष करतात. सिस्टीम अपडेट करीत नाहीत. ही चुकीची बाब आहे. सध्याच्या काळात स्मार्ट फोन, लॅपटॉपसारखा वापरल्या जातो. आर्थिक व्यवहारांसोबत सर्वच कामे स्मार्ट फोनच्या साह्याने करण्यात येत आहेत. प्रत्येक कामासाठी यूझर नेम व पासवर्डची गरज असते. परंतु अनेक उपभोक्ते असेही असतात जे सर्वच कामांसाठी एकाच प्रकारचा पासवर्ड व यूझर नेम वापरतात. ही अतिशय धोकादायक बाब आहे. उपभोक्त्यांनी यापासून सावध राहणे गरजेचे आहे. त्यांच्यासोबत अमरावती व नागपूर विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी, नागपूरचे जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, चंद्रपूरचे जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके उपस्थित होते.
आधार सुरक्षित
सिंह यांनी सांगितले की, आधारकार्डला बँकेशी लिंक करण्याबाबत अनेक नागरिकांमध्ये संभ्रम आहे. अनेक नागरिकांना ही शंका आहे की, फोन व बँकेशी आधार लिंक केल्यास त्यांची गोपनीय माहिती म्हणजे बायोमेट्रिक डाटा सार्वजनिक होईल. परंतु असे होत नसून आधार पूर्णपणे सुरक्षित आहे. कुणाचाही बायोमेट्रिक डाटा सार्वजनिक होण्याचा कोणताही धोका नाही. नागरिकांनी शंकांपासून दूर राहून आपले आधार बँक खात्याशी लिंक करावयास हवे.
सायबर गुन्हे रोखण्यासाठी व्यापक तयारी
सिंह यांनी सांगितले की, सायबर गुन्हे रोखण्यासाठी व्यापक तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी अनेक योजना लागू करण्यात आल्या आहेत. आगामी दिवसात काही योजना लागू करण्यात येतील. सायबर गुन्हे थांबविण्यासाठी अधिकाऱ्यांची चमू गठित करण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
माहिती व जनसंपर्कास गती
सिंह यांनी सांगितले की, राज्यात माहिती व जनसंपर्काच्या कार्यात गती आणण्यात येत आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. सोबतच मीडियाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहचण्यात येत आहे. सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करण्यात येत आहे. सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेबसाईट अपडेट करण्यात येत आहे. यामुळे काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंग साईट्सवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयासोबत जुळलेल्यांची संख्या वाढली आहे. लोकराज्य या मासिकामुळेही प्रसारात वाढ झाली आहे.

Web Title: Be alert with cyber crime: Brijesh Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.