सावधान, मिठाई खरेदी करताना दक्ष रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:11 AM2021-09-17T04:11:57+5:302021-09-17T04:11:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सणासुदीच्या काळात अनेक मिठाई, पेढे, खवा व नमकीन पदार्थ बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीला ...

Be careful, be careful when buying sweets | सावधान, मिठाई खरेदी करताना दक्ष रहा

सावधान, मिठाई खरेदी करताना दक्ष रहा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सणासुदीच्या काळात अनेक मिठाई, पेढे, खवा व नमकीन पदार्थ बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीला उपलब्ध आहेत. मात्र सणासुदीत मिठाई घेताना ग्राहकांनी सावधगिरी बाळगावी, अशा सूचना अन्न व औषध प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.

सणासुदीच्या काळात बाजारपेठेत विविध प्रकारचे पेढे, मिठाई, खवा, नमकीन आदी पदार्थांमध्ये भेसळ आढळू शकते. किंवा हे पदार्थ वापरण्याची तारीख उलटून गेलेली असू शकते. तसेच खाद्यतेल, साजूक तूप, दूध, दही इत्यादी पदार्थांमध्येही भेसळ असू शकते. त्यामुळे ग्राहकांनी दुकानात खरेदी करताना ते ताजे पदार्थ आहेत का नाही, हे तपासून घेण्याची सूचना विभागाने केली आहे. तसेच मिठाई विक्रेत्यांनाही आवश्यक सूचना दिल्या आहेत.

---

बॉक्स

- अशी घ्या काळजी

दूध, खवा, खाद्यतेल, वनस्पती तूप, साजूक तूप हे पदार्थ परवानाधारक, नोंदणीकृत व्यावसायिकांकडून खरेदी करावेत.

- त्यांची बिलेही सांभाळून ठेवावीत.

-ग्राहकांनी उघड्यावरील अन्नपदार्थ खरेदी करु नये.

खव्यापासून तयार केलेल्या मिठाईचे सेवन शक्यतो २४ तासांच्या आतच करावे.

-मिठाई साठवणूक करण्यायोग्य तापमानात ठेवावे.

मिठाईची चव किंवा गंधात फरक जाणवल्यास ती नष्ट करावी.

-----

बॉक्स

मिठाई विक्रेत्यांसाठी आवश्यक सूचना

- भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणातर्फे मिठाई विक्रेत्यांना प्रत्येक मिठाईच्या ट्रेवर दर्शनी भागात मिठाई तयार केल्याचा दिनांक आणि ती वापरण्यायोग्य कालावधी (बेस्ट बिफोर डेट) यांचा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक आहे.

- मिठाई तयार करताना खाद्यरंगाचा मर्यादेतच वापर करावा.

- दुकानातील परिसर स्वच्छ ठेवावा.

- दुग्धजन्य मिठाई ही आठ ते दहा तासांच्या आतच खाण्याबाबत ग्राहकांना निर्देश द्यावेत.

- माशा बसू नये म्हणून अन्नपदार्थावर जाळीदार झाकण टाकावे.

- स्वतःचे व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे.

- अन्नपदार्थ तयार करताना एका तेलाचा वापर फार तर दोन किंवा तीन वेळाच करावा. त्यानंतर ते तेल बायोडिझेल कंपन्यांना देण्यात यावे

बॉक्स

...तर तक्रार करा

अन्नपदार्थ व मिठाई विक्रेत्यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील तरतुदींचा भंग केल्याचे आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. अन्नपदार्थात भेसळ किंवा फसवणूक केल्याचे आढळल्यास ग्राहकांनी प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ०७१२-२५५५१२० या कार्यालयातील दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त जयंत वाणे यांनी म्हटले आहे.

Web Title: Be careful, be careful when buying sweets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.