सावधान! नागपुरात श्वानांचे हल्ले वाढताहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 06:39 PM2020-05-05T18:39:32+5:302020-05-05T18:42:10+5:30

लॉकडाऊनमध्ण्ये पूर्व नागपुरातील प्रभाग २४ मध्ये श्वानांची दहशत वाढली आहे. प्रभागातील भारतनगर, गुजराती कॉलनीत गेल्या आठवड्यात सहापेक्षा अधिक नागरिकांवर श्वानांनी हल्ला चढवून जखमी केले.

Be careful! Dog attacks are on the rise in Nagpur | सावधान! नागपुरात श्वानांचे हल्ले वाढताहेत

सावधान! नागपुरात श्वानांचे हल्ले वाढताहेत

Next
ठळक मुद्देप्रभाग २४ मधील नागरिक त्रस्त : तक्रारीनंतरही महापालिकेचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लॉकडाऊनमध्ण्ये पूर्व नागपुरातील प्रभाग २४ मध्ये श्वानांची दहशत वाढली आहे. प्रभागातील भारतनगर, गुजराती कॉलनीत गेल्या आठवड्यात सहापेक्षा अधिक नागरिकांवर श्वानांनी हल्ला चढवून जखमी केले. याबाबत नागरिकांनी नगरसेवक तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे सूचनावजा तक्रार केली. मात्र त्यानंतरही या श्वानांना पकडले नाही. परिणामी बेवारस श्वान तसेच फिरत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले नाही. आतातर हे श्वान घरातही शिरत असल्याचे पुढे आले आहे.
गणेश निमजे, प्रमोद गडिया यांच्यासह काही महिला आणि बालकांवर श्वानांनी हल्ले चढवत त्यांना जखमी केले. गणेश निमजे यांनी सांगितले की, ते किराणा घेण्यासाठी घराबाहेर निघालेले होते. दरम्यान, श्वानाने त्यांच्यावर हल्ला चढवत जखमी केले. प्रमोद गडिया यांच्यासोबतही असाच काहीसा प्रकार घडला. श्वानांच्या भीतीमुळे महिला आणि छोटी मुले घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. आता लॉकडाऊन असल्याने कुणीही घराबाहेर पडत नाही. मात्र त्यानंतर जनजीवन सुरळीत झाल्यावर श्वानांचे हल्ले वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मोठ्या दुर्घटनेची शक्यता
प्रभागातून भरतवाडा रोड, शिक्षक कॉलनी भागात जाणाºया नागरिकांच्या वाहनावर रात्रीच्या वेळी श्वान अचानक तुटून पडतात. अंधारात श्वान लपून बसलेले असतात. वाहन आल्यास अचानकपणे हल्ला चढवितात. त्यातच भीतीमुळे अनेकदा दुर्घटना झालेल्या आहेत. भविष्यातही आणखी अशा घटना घडण्याची शक्यता आहे.

Web Title: Be careful! Dog attacks are on the rise in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.