सोशल मीडियावरून वातावरण बिघडवाल तर खबरदार; महिनाभरात साडेसातशे ‘यूआरएल’वर ‘हंटर’

By योगेश पांडे | Published: December 11, 2023 06:21 AM2023-12-11T06:21:32+5:302023-12-11T06:21:43+5:30

देशविरोधी कारवायांना रोखण्यासाठी केंद्राचे कठोर पाऊल

Be careful if you spoil the atmosphere through social media; 'Hunter' on 750 URLs within a month | सोशल मीडियावरून वातावरण बिघडवाल तर खबरदार; महिनाभरात साडेसातशे ‘यूआरएल’वर ‘हंटर’

सोशल मीडियावरून वातावरण बिघडवाल तर खबरदार; महिनाभरात साडेसातशे ‘यूआरएल’वर ‘हंटर’

योगेश पांडे

नागपूर : सोशल मीडिया’च्या युगात या ‘प्लॅटफॉर्म’चा उपयोग करून देशविरोधी कारवाया तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येतो. मात्र, केंद्र शासनाने अशा ‘युझर्स’विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. २०२३ मध्ये देशविरोधी ‘यूआरएल’ला ‘ब्लॉक’ करण्याची संख्या वाढीस लागली आहे. देशात दर महिन्याला सरासरी साडेसातशे ‘यूआरएल’ला ‘ब्लॉक’ करण्यात आले आहे.

‘एक्स’ व ‘फेसबुक’वरील खात्यांवरच सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञाना खात्याच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.

३६,८३८

२०१८ पासून विविध ‘प्लॅटफॉर्म्स’ वरील ‘ब्लॉक’ केलेल्या ‘यूआरएल’ 

९,८४९

२०२० या वर्षभरात केलेल्या सर्वाधिक कारवायांची संख्या

वर्षनिहाय कारवाई

वर्ष :   एकूण

२०१८  २,७९९

२०१९   ३,६३५

२०२०   ९,८४९

२०२१   ६,११८

२०२२   ६,९३५

२०२३   ७,५०२

Web Title: Be careful if you spoil the atmosphere through social media; 'Hunter' on 750 URLs within a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.