सावधान,आंबा झालाय विषारी

By admin | Published: April 12, 2017 01:40 AM2017-04-12T01:40:59+5:302017-04-12T01:40:59+5:30

कळमना बाजारपेठेत सध्या आंब्याची आवक वाढली आहे. आंध्र प्रदेशासह रत्नागिरी येथून आंब्याची खेप दररोज बाजारात येत आहे.

Be careful, mangoes, poisonous | सावधान,आंबा झालाय विषारी

सावधान,आंबा झालाय विषारी

Next

विक्रेत्यांवर कारवाई केव्हा? : अन्न व औषध प्रशासन सुस्त
नागपूर : कळमना बाजारपेठेत सध्या आंब्याची आवक वाढली आहे. आंध्र प्रदेशासह रत्नागिरी येथून आंब्याची खेप दररोज बाजारात येत आहे. गडद पिवळ्या रंगाच्या आंब्याला जास्त भाव मिळत असल्यामुळे व्यापारी कार्बाईड रसायनाचा वापर करून आंबे पिकवत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करावी, अशी ग्राहकांची मागणी आहे.
आंबे पिकविण्यासाठी
रसायनाचा वापर
अन्नधान्याप्रमाणे फळांमध्येही भेसळ करण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे. कृत्रिमरीत्या आंबा पिकविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॅल्शियम कार्बाइड प्रक्रियेवर राज्य सरकारने बंदी घातली आहे.
आंबा लवकर पिकविण्यासाठी व त्याला गडद पिवळा रंग यावा, यासाठी आंब्याच्या पेटीत कार्बाईड पावडर टाकली जाते. ही पावडर पेटीत उष्णता निर्माण करते व आंब्याला चांगला रंग देते. व्यापारी या पावडरचा वापर करीत असल्याच्या तक्रारी आहेत. गेल्यावर्षी कळमन्यात कारवाईदरम्यान विभागाने जवळपास २.५ लाख रुपयांचे आंबे जप्त केले होते. आंबे विषारी झाले आहेत. विषारी आंब्यावर विभाग कारवाई केव्हा करणार, हा गंभीर प्रश्न आहे.
यावर्षी कारवाईबाबत विभाग सुस्त आहे. गुढीपाडव्यानंतर सर्व प्रकारच्या आंब्याची आवक वाढली असून हातठेल्यांवर मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. सहसा सुरुवातीच्या दिवसात बाजारात विक्रीसाठी आलेले आंबे गडद पिवळे नसतात. पण विक्रीसाठी उपलब्ध असलेले आंबे गडद पिवळ्या रंगाचे दिसत आहेत. हे आंबे रसायनाने पिकविलेले आहेत, असे ग्राहकांचे मत आहे. रसायनाचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेऊन विभागाने कारवाई करावी, अशी ग्राहकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)

जीवावर उठणाऱ्यांना अभय नाही
रसायनांचा वापर करून पिकवलेले आंबे वा अन्य फळे विकून पैसे कमावणाऱ्यांना अभय दिले जाणार नाही. नियमबाह्य वर्तन करणाऱ्यांवर कारवाई करण्यास आमचा विभाग सक्षम आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन अधिकारी तपासणी आणि कारवाई करतील. यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. गैरप्रकार आढळले तर नागरिकांनी आमच्या कार्यालयाला माहिती द्यावी.
मिलिंद देशपांडे, सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन विभाग.

Web Title: Be careful, mangoes, poisonous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.