नैसर्गिक आपत्तीत जीवितहानी होणार नाही यासाठी खबरदारी घ्या : डॉ. संजीव कुमार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 08:34 PM2021-06-02T20:34:43+5:302021-06-02T20:36:24+5:30

Dr. Sanjeev Kumar, Monsoon हवामान विभागाकडून मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असल्यामुळे विभागातील नद्यांच्या पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांमध्ये जीवित तसेच पिकांची व वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना सज्ज ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिले.

Be careful not to lose your life in a natural disaster: Dr. Sanjeev Kumar | नैसर्गिक आपत्तीत जीवितहानी होणार नाही यासाठी खबरदारी घ्या : डॉ. संजीव कुमार 

नैसर्गिक आपत्तीत जीवितहानी होणार नाही यासाठी खबरदारी घ्या : डॉ. संजीव कुमार 

Next
ठळक मुद्देमान्सूनपूर्व तयारीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : हवामान विभागाकडून मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असल्यामुळे विभागातील नद्यांच्या पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांमध्ये जीवित तसेच पिकांची व वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना सज्ज ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी मान्सूनपूर्व करण्यात आलेल्या तयारीचा आढावा डॉ. संजीव कुमार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत भारतीय सेनादलाचे कर्नल बढिये, भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर लक्ष्मण के. राव, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे कमांडर पंकज डहाणे, सिंचन विभागाचे मुख्य अभियंता पवार, महसूल उपायुक्त मिलिंद साळवे, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त श्रीकांत फडके, विकास उपायुक्त अंकुश केदार, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जैस्वाल, पोलीस उपायुक्त राजमाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख उपस्थित होते.

सिंचन प्रकल्पामधून पुराचे पाणी सोडताना नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देणारी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देताना मागील वर्षी पुरामुळे बाधित झालेली गावे तसेच पूरनियंत्रण रेषेनुसार बाधित होणाऱ्या गावांमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून विभागात मॉक ड्रिल आयोजित करावे, यासाठी जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणा उपस्थित राहील याबाबत खबरदारी घेण्यात यावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करावा

जिल्हा तसेच तालुकास्तरावरील नियंत्रण कक्ष २४ तास सुरू ठेवावेत. नियंत्रण कक्षामध्ये आवश्यक माहितीसह तत्काळ प्रतिसाद मिळेल याची खबरदारी घ्यावी. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करावा. आपत्ती निवारणासाठीचे सर्व साहित्य सुस्थितीत असून तत्काळ वापर करणे शक्य आहे या दृष्टीने प्रमाणित करून त्याचा अहवाल तत्काळ सादर करावा, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

अशाही दिल्या सूचना

आंतरराज्य वाहणाऱ्या नद्यांसंदर्भात पावसाचे तसेच पुराच्या माहितीचे आदानप्रदान करावे.

शेतपीक, फळपीक नुकसानीसंदर्भातही आवश्यक खबरदारी घ्यावी.

पुरामुळे नुकसान झाल्यानंतर नुकसानीचा अहवाल तातडीने करावा.

नैसर्गिक आपत्तीमध्ये जीवितहानी झाल्यास अशा कुटुंबांना तत्काळ मदत उपलब्ध होईल असे नियोजन करावे.

पूरपरिस्थिती बाधित कुटुंबांना अन्नाची पाकिटे वितरित करताना ती सुस्थितीत राहतील या दृष्टीने खबरदारी घ्यावी.

पुराचे पाणी सोडण्यापूर्वी संबंधित यंत्रणांना आवश्यक पूर्वसूचना मिळावी.

बाधित गावांमध्ये भारतीय सेनेतर्फे मदत पुरविण्यासाठी प्रशासनातर्फे समन्वय असणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती करावी.

नैसर्गिक आपत्तीच्या बैठकीत विभागामध्ये समन्वय ठेवावा.

एसडीआरतर्फे जिल्हास्तरावर प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत.

Web Title: Be careful not to lose your life in a natural disaster: Dr. Sanjeev Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.