'बे एक बे' स्पर्धा : सात हजार विद्यार्थ्यांनी स्पर्धेत वाचले पाढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:47 AM2019-12-24T00:47:21+5:302019-12-24T00:52:39+5:30
मुलांमध्ये गणिताची गोडी निर्माण व्हावी. डिजिटल कॅलक्युलेटरच्या काळात मुलांना पाढे पाठ व्हावेत, या उद्देशाने अग्रेसर फाउंडेशनने घेतलेल्या आंतरशालेय 'बे एक बे' या गणित स्पर्धेला उत्स्फूर्ते प्रतिसाद मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुलांमध्ये गणिताची गोडी निर्माण व्हावी. डिजिटल कॅलक्युलेटरच्या काळात मुलांना पाढे पाठ व्हावेत, या उद्देशाने अग्रेसर फाउंडेशनने घेतलेल्या आंतरशालेय 'बे एक बे' या गणित स्पर्धेला उत्स्फूर्ते प्रतिसाद मिळाला. शहारातील ३५ शाळांमधून तब्बल ७ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला.
स्पर्धेत विजयी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी जय्यत तयारी केली होती. अग्रेसर फाऊंडेशनच्या ७० स्वयंसेवकांच्या योगदानातून स्पर्धा घेण्यात आली. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना दोन ते विस पर्यंत, तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन ते तीस पर्यंतचे पाढे मुकपाठ असणे अपेक्षित होते. स्पर्धेत 'पंधरा साते किती', 'बारा आठे किती' असे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात आले. अग्रेसर फाऊंडेशनने 20 डिसेंबरला अंतिम फेरी घेतली. यात उत्तीर्ण स्पर्धकांना गौरविण्यात आहे. निहाल नानेटकर, ऋषिकेश जोशी, स्वप्नील तडस, श्रेयस जटलवार, जगदीश चिंतलवार, सचिन कश्यप, दीपक फुलबांधे, रक्षक ढोके, मोहित येंडे, अविनाश नारनवरे, वैष्णवी राऊत, अनुप सरोदे, अनिकेत ढबाले, महेश पाखमोडे, योगिता धोत्रे, दीपक तायवाडे, संकेत दुबे व मेघ गेडाम यांनी अग्रेसर फाउंडेशनच्या सदस्यांच्या मदतीने स्पर्धेची धुरा सांभाळली.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव
स्पधेर्चा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी गणित दिनी आयोजित करण्यात आला. पहिल्या गटात सक्षम हातमोडे यास प्रथम, विनीत तोंडारेला द्वितीय व कृतिका हरडेला तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. दुसऱ्या गटात वंश तितमारेने प्रथम क्रमांक पटकावला. गिरिश डाफला द्वितीय तर तुलसी देवांगणला तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी केशवनगर शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद भाखरे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून आशुतोष वक्रे, दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे संचालक दीपक खिरवडकर, बिपीन गिरडे, धनवटे महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेंद्र जिचकार, राहुल राय उपस्थित होते. प्रास्ताविक प्रांजली वानखेडे यांनी केले. संचालन साक्षी राऊत, आयुष मुळे व कृतिका लाखे यांनी केले. आभार पियुष बोईनवाड यांनी मानले.