बँकेतून रक्कम घेऊन निघालेल्या नोकराला मारहाण; दीड लाख लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 10:40 PM2021-12-23T22:40:17+5:302021-12-23T22:40:44+5:30

Nagpur News बँकेतून रक्कम घेऊन व्यापाऱ्याच्या घरी निघालेल्या नोकराला मारहाण करून दोन भामट्यांनी दीड लाखांची रोकड लुटून नेली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी १२.१५च्या सुमारास ही घटना घडली.

Beating of a employee; One and a half lakh was looted | बँकेतून रक्कम घेऊन निघालेल्या नोकराला मारहाण; दीड लाख लुटले

बँकेतून रक्कम घेऊन निघालेल्या नोकराला मारहाण; दीड लाख लुटले

Next
ठळक मुद्देबँकेतूनच करत होते पाठलाग

नागपूर : बँकेतून रक्कम घेऊन व्यापाऱ्याच्या घरी निघालेल्या नोकराला मारहाण करून दोन भामट्यांनी दीड लाखांची रोकड लुटून नेली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी १२.१५च्या सुमारास ही घटना घडली.

आशुतोष सुभाष रांधर यांचा लकडगंजमध्ये संजीवनी गृहउद्योग आहे. त्यांच्याकडे पंकज चंद्रशेखर घुटके (वय ३७, रा. शक्तीमाता नगर, खरबी) हा कारचालक म्हणून काम करतो. रांधर यांनी घुटकेला धनादेश देऊन बँकेत पाठविले. एचडीएफसी बँकेतून धनादेश वटविल्यानंतर दीड लाखांची रोकड घेऊन घुटके दुचाकीने निघाले. आंबेडकर मेट्रो स्टेशनजवळ मागून दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी त्यांना अडविले. घुटके यांच्या जवळची पैशांची बॅग ते हिसकावू लागले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे गोंधळलेल्या घुटकेच्या हातून दुचाकी सुटली अन् ते खाली पडले. त्यामुळे जबर जखमी झाले. ही संधी साधून भामट्यांनी त्यांच्याजवळची दीड लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून पळ काढला. घुटके यांनी प्रारंभी रांधार यांना आणि नंतर लकडगंज ठाण्यात माहिती दिली. ते कळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

 

Web Title: Beating of a employee; One and a half lakh was looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.