ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण : नागपुरातील गोधनीत तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 09:02 PM2020-06-06T21:02:46+5:302020-06-06T21:05:02+5:30

हॅन्डपंपजवळच्या पाण्याचे सॅम्पल घेऊन ग्राम पंचायत कार्यालयात परतलेल्या एका कर्मचाºयाला चौघांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेची पोलिसात तक्रार केल्यास जीवे ठार मारू, अशी धमकीही दिली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोधनी ग्राम पंचायत कार्यालयात शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. त्यामुळे परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते.

Beating of Gram Panchayat employee: Tension in Godhani in Nagpur | ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण : नागपुरातील गोधनीत तणाव

ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण : नागपुरातील गोधनीत तणाव

Next
ठळक मुद्देचौघांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हॅन्डपंपजवळच्या पाण्याचे सॅम्पल घेऊन ग्राम पंचायत कार्यालयात परतलेल्या एका कर्मचाºयाला चौघांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेची पोलिसात तक्रार केल्यास जीवे ठार मारू, अशी धमकीही दिली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोधनी ग्राम पंचायत कार्यालयात शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. त्यामुळे परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते. शुक्रवारी रात्री या प्रकरणात मानकापूर पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.
ललित गुणवंतराव घोंगे हे गोधनी (रेल्वे) ग्राम पंचायत कार्यालयात पाणीपुरवठा विभागात सुपरवायझर आहे. शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास त्यांनी गोधनी पीटेसूर येथील बोअरवेल जवळ जाऊन पाण्याचे नमुने घेतले. हे नमुने घेऊन ते ग्रामपंचायत कार्यालयात आले असता त्यांच्या मागे आरोपी शिराज शेख, शाहरुख ऊर्फ परवेज नामदार खान, ताजुद्दीन ऊर्फ खजूरउद्दीन शेख आणि सोल्जर खान हे चौघे आले. त्यांनी घोंगे यांच्यासोबतच सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या नावाने शिवीगाळ सुरू केली. पाण्यात कचरा टाकून तू सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱयांना दाखवणार आहे का, अशी विचारणा करत आरोपींनी घोंगे यांच्याशी वाद घातला. घोंगे यांची बाजू ऐकून न घेता आरोपींनी त्यांना मारहाण केली. या मारहाणीत घोंगे यांच्या डोळ्याला जखम झाली. या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात केल्यास तुला जिवंत ठार मारेन, अशी धमकीही आरोपींनी दिली. या घटनेमुळे ग्रामपंचायत कार्यालय परिसरात तणाव निर्माण झाला. मानकापूर पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौकशी केली. त्यानंतर घोंगे यांची तक्रार नोंदवून आरोपींविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. आरोपी शाहरुख तसेच खजूरउद्दीन शेख या दोघांना अटक केली. दोन आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: Beating of Gram Panchayat employee: Tension in Godhani in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.