उधारीच्या पैशावरून महिलेला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:07 AM2021-06-26T04:07:50+5:302021-06-26T04:07:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उधार दिलेल्या रकमेवरून वाद झाल्यानंतर एका कुटुंबातील महिला, पती आणि मुलाने बचत गट चालविणाऱ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उधार दिलेल्या रकमेवरून वाद झाल्यानंतर एका कुटुंबातील महिला, पती आणि मुलाने बचत गट चालविणाऱ्या महिलेला मारहाण करून शिवीगाळ केली. बुधवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास सक्करदऱ्यात ही घटना घडली.
तक्रार करणारी महिला (वय ४०) बचत गटाची प्रमुख आहे. ती आपल्या गटातील महिलांना आर्थिक मदत करते. तिने नवीन सुभेदार भागात राहणाऱ्या महिलेला २० हजार रुपये उधार दिले होते. त्यातील ६ हजार रुपये परत करून नंतर मात्र सदर महिला रक्कम परत करण्यास टाळाटाळ करू लागली. त्यामुळे बुधवारी सायंकाळी सदर महिला रक्कम मागण्यासाठी कर्जदार महिलेच्या घरी गेली. तेथे रक्कम उधार घेणारी महिला आणि तिचा पती अविनाश गडपायले या दोघांनी बचत गट चालविणाऱ्या महिलेला मारहाण केली. तिला अश्लील शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला तर आरोपी दाम्पत्याच्या मुलाने वीट फेकून मारून पीडित महिलेच्या ॲक्टिव्हाचे नुकसान केले. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी आरोपी गडपायले दाम्पत्य तसेच मुलावर मारहाण करून विनयभंग करणे आणि तोडफोड करून नुकसान केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
---