नागपुरातील गांधीसागर सौंदर्यीकरणाला लवकरच सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 12:29 AM2020-01-09T00:29:19+5:302020-01-09T00:30:19+5:30

गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण व पुनर्बांधणीच्या महापालिकेच्या ३१.१५ कोटींच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यातील पहिल्या टप्प्यात सौंदर्यीकरणावर १८ कोटींचा खर्च केला जाणार आहे.

The beautification of Gandhisagar started soon in Nagpur | नागपुरातील गांधीसागर सौंदर्यीकरणाला लवकरच सुरुवात

नागपुरातील गांधीसागर सौंदर्यीकरणाला लवकरच सुरुवात

Next
ठळक मुद्देशासनाकडून प्राप्त १८ कोटींच्या निविदा : लगतच्या नाल्याचे पाण्यावर प्रक्रिया करुन तलावात सोडणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण व पुनर्बांधणीच्या महापालिकेच्या ३१.१५ कोटींच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यातील पहिल्या टप्प्यात सौंदर्यीकरणावर १८ कोटींचा खर्च केला जाणार आहे. सौंदर्यीकरणाचे काम जे. डी. कंपनीला देण्यात आले आहे. तलावाचा लवकरच कायापालट होणार आहे.
तलावालगतच्या नाल्यातील पाण्यावर प्रक्रिया करूने ते तलावात सोडले जाणार आहे. तसेच तलावातील जलसाठ्यात वाढ व्हावी, यासाठी जलस्रोत निर्माण केले जातील, अशी माहिती क्र ीडा सभापती प्रमोद चिखले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी धंतोली झोनच्या सभापती लता काडगाये, नगरसेवक डॉ. छोटू भोयर, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार आदी उपस्थित होते.
महापालिका प्रशासनाने गांधीसागर तलाव सौंदर्यीकरण व पुनर्बांधणीबाबतचा सुधारित प्रस्ताव ११ फेब्रुवारी २०१९ रोजी शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार आता हा प्रकल्प दोन टप्प्यात राबविण्याला मंजुरी दिली आहे. विशेष निधीतून पहिल्या टप्प्यात गांधीसागर तलावाच्या मध्यभागी असलेल्या भाऊजी पागे उद्यानाची पुनर्बांधणी, तलावाच्या पडलेल्या भिंती बांधणे व उर्वरित भिंतीचे सशक्तीकरण आदी कामांचा यात समावेश आहे. तलावालगतच्या एम्प्रेस मॉलच्या बाजूने नाला आहे. या नाल्याच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते तलावात सोडण्यात येणार आहे.
खाद्यपदार्थ विक्रेत्यांना गांधीसागर तलावाच्या बाजूला मोकळ्या जागेत खाऊगल्ली निर्माण करण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी स्थायी समितीने घेतला होता. त्यानुसार येथे ३२ डोम उभारण्यात आले आहेत. परंतु बांधल्यापासून ते वापराविना होते. येथे डागडुजी, दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच पागे उद्यानाच्या बाजूला पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. तलाव सौंदर्यीकणामुळे खाऊगल्लीला चांगले दिवस येणार आहे.

खाऊ गल्लीचे आज लोकार्पण
गांधीसागर तलावालगतच्या खाऊ गल्लीचे लोकार्पण गुरुवारी सायंकाळी ६ वाजता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जा मंत्री नितीन राऊ त, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, महापौर संदीप जोशी यांच्यासह आमदार व महापालिकेतील पदाधिकारी उपस्थित राहतील. खाऊ गल्लीतील ३२ डोम व्यावसायिकांना देण्यात आले आहे. येथे महापालिकेतर्फे आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करणार असल्याची माहिती प्रमोद चिखले यांनी दिली.

Web Title: The beautification of Gandhisagar started soon in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.