तलावाचे सौंदर्यीकरण करा, अन्यथा ऑगस्ट क्रांती दिनापासून उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:07 AM2021-07-21T04:07:39+5:302021-07-21T04:07:39+5:30
नागपूर : प्रभाग ५ अंतर्गत येणाऱ्या नवी मंगळवारी भागातील ३०० वर्षे जुन्या तलावाची दुरवस्था झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून ...
नागपूर : प्रभाग ५ अंतर्गत येणाऱ्या नवी मंगळवारी भागातील ३०० वर्षे जुन्या तलावाची दुरवस्था झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून तलाव दुर्गंधीयुक्त झाला आहे. या तलावाला स्वच्छ करून त्याचे सौंदर्यीकरण करण्यात यावे. जर सौंदर्यीकरण झाले नाही तर ऑगस्ट क्रांती दिनापासून उपोषण करण्यात येईल, असा इशारा आम आदमी पक्षातर्फे दिला आहे.
गडरलाईनचे पाणी तसेच आजूबाजूला घाण आणि कचरा व निर्माल्य यामुळे तलाव दूषित झाला आहे . यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक प्रकारच्या आजाराशी सामना करावा लागत आहे . तलावाला स्वच्छ करण्यासाठी नागरिकांनी अनेक निवेदने दिली, परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्या गेले. या तलावाला स्वच्छ करण्यात यावे, अशी मागणी आपतर्फे करण्यात आली. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांना निवेदन देण्यात आले. जर कामाला सुरुवात झाली नाही तर २६ जुलै व ३ ऑगस्ट रोजी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल आणि ९ ऑगस्टपासून तलावाजवळ बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी विजय नंदनवार, भूषण ढाकुलकर , रोशन डोंगरे , प्रदीप पौनीकर , गुणवंत सोमकुवर, राज कुंभारे , योगेश पराते , अमित अंबादे , स्विटी इंदोरकर , स्वप्नील सोमकुंवर , जगदीश रोकडे प्रामुख्याने उपस्थित होते.