उच्च न्यायालयाचे सौंदर्य लोप पावू नये

By admin | Published: March 12, 2016 03:27 AM2016-03-12T03:27:47+5:302016-03-12T03:27:47+5:30

उच्च न्यायालयाच्या सध्याच्या हेरिटेज इमारतीच्या दर्शनी भागाचे वेगळेच सौंदर्य आहे. हा भाग संरक्षण भिंतीमुळे झाकोळला जाऊ नये ..

The beauty of the High Court should not be lost | उच्च न्यायालयाचे सौंदर्य लोप पावू नये

उच्च न्यायालयाचे सौंदर्य लोप पावू नये

Next

संरक्षण भिंतीचे काम रूपरेषेनुसार करा : हेरिटेज संवर्धन समितीचे निर्देश
नागपूर : उच्च न्यायालयाच्या सध्याच्या हेरिटेज इमारतीच्या दर्शनी भागाचे वेगळेच सौंदर्य आहे. हा भाग संरक्षण भिंतीमुळे झाकोळला जाऊ नये म्हणून विधान भवनाच्या संरक्षण भिंतीच्या रूपरेषेनुसार उच्च न्यायालयाची संरक्षण भिंत असावी. यानुसार सुधारित प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश हेरिटेज संवर्धन समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.
शहरातील वास्तुशास्त्रीयदृष्ट्या जतन करावयाच्या हेरिटेज वास्तू परिसराबाबत गठित हेरिटेज संवर्धन समितीची बैठक शुक्रवारी समितीचे अध्यक्ष अरुण पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमध्ये बैठक झाली. हेरिटेज संवर्धन समितीच्या मागील बैठकीमध्ये उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूर इमारतीच्या उत्तर आणि पूर्व बाजूस संरक्षण भिंतीची उंची वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. यानुसार सार्वजनिक विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना बांधकाम विभागाचे नकाशे, संगणकीकृत ‘थ्री डी व्ह्यू ड्रॉईंग’ सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. उच्च न्यायालय, नागपूर येथील परिसरात दोन नवीन कार्यालयीन इमारतीचे बांधकाम करण्याकरिता हेरिटेज संवर्धन समितीची मान्यता प्रदान करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी मागितली होती. याबाबतचे प्रस्तावित बांधकामाचे नकाशे माहितीसह लवकरच सादर करण्यात येईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता संजय इंदूरकर यांनी यावेळी दिली.
यावेळी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, नीरीचे संचालक तपन चक्रवर्ती, अतिरिक्त उपायुक्त प्रमोद भुसारी, एल.ए.डी. महाविद्यालयाच्या प्राचार्या उज्ज्वला चक्रदेव, नागपूर वस्तू संग्रहालयाचे क्युरेटर डॉ. विराग सोनटक्के, नागपूर विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रपाठक डॉ. श्रीमती शुभा जोहरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय इंदूरकर, पोलीस गृहनिर्माण सोसायटीचे मुख्य अभियंता एम.एम. डेकाटे, मेट्रो रेल्वेचे महाप्रबंधक डी. जी. फिलीप, वास्तुविशारद अशोक मोखा, नगररचना विभागाच्या सहायक संचालक श्रीमती सुप्रिया थूल, दिगंबर मेहर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

पोलीस प्रशासकीय इमारतीला मंजुरी
सिव्हिल लाईन्स, नागपूर येथील पोलीस आयुक्त बंगला हेरिटेज स्थळामध्ये येतो. ही हेरिटेज इमारत कायम ठेवून त्याच्या मागील परिसरात नियोजित प्रशासकीय इमारत बांधकाम करण्याकरिता महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित तर्फे मुख्य अभियंता एम.एम. डेकाटे यांनी यावेळी परवानगी मागितली. त्यानुसार डेकाटे यांनी सादर केलेल्या प्रस्तावास समितीने तत्त्वत: मान्यता दिली. तथापि संपूर्ण सविस्तर प्रस्ताव, फोटो, रेस्टोरेशन, नियोजन, कॉन्सेप्च्युअल व्ह्यू यासह सविस्तर प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना यावेळी देण्यात आल्या. या वेळी कस्तूरचंद पार्क या हेरिटेज स्थळाच्या देखभालीबाबत तसेच तेथील स्वच्छता, सुव्यवस्था व सुरक्षा याबाबत संबंधितांशी चर्चा करण्यात आली.

Web Title: The beauty of the High Court should not be lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.