गर्लफ्रेण्डच्या नादात बनला गुन्हेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 10:25 PM2020-12-22T22:25:59+5:302020-12-22T22:27:26+5:30

Became a criminal for girlfriend, crime news गर्लफ्रेण्डला प्रभावित करण्याच्या नादात गुन्हेगार बनलेल्या एका सराईत चोरट्याच्या सीताबर्डी पोलिसांनी मुसक्या बांधल्या.

Became a criminal in the name of girlfriend | गर्लफ्रेण्डच्या नादात बनला गुन्हेगार

गर्लफ्रेण्डच्या नादात बनला गुन्हेगार

Next
ठळक मुद्देनोटा उधळण्यासाठी दुचाकींची चोरी - सीताबर्डी पोलिसांनी बांधल्या मुसक्या

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - गर्लफ्रेण्डला प्रभावित करण्याच्या नादात गुन्हेगार बनलेल्या एका सराईत चोरट्याच्या सीताबर्डी पोलिसांनी मुसक्या बांधल्या. रिषभ श्याम असोपा (वय २४) असे त्याचे नाव आहे. तो कळमन्याच्या सूर्यनगरातील रहिवासी आहे. त्याच्याकडून चोरीच्या १० दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.

आरोपी रिषभला नवनवीन मुलींसोबत मैत्री करण्याची हाैस आहे. त्यांना प्रभावित करण्यासाठी वेगवेगळी वाहने आणि खिसे भरून रक्कम घेऊन तो फिरत असतो. त्यासाठी त्याने वाहनचोरीचा मार्ग निवडला. चोरलेले वाहन गर्लफ्रेण्डच्या माध्यमातून मिळेल त्या किमतीत विकायचे आणि विविध प्रकारचे व्यसन तसेच मुलींवर ती रक्कम उधळायची. पुन्हा नवे वाहन चोरायचे, अशी त्याची सवय आहे. शनिवारी १९ डिसेंबरला तो सीताबर्डी पोलिसांच्या पथकाच्या नजरेस पडला. त्याच्याजवळ पांढऱ्या रंगाची ॲक्टिव्हा होती. पोलिसांनी गाडीची कागदपत्रे मागितली असता तो गडबडला. त्यामुळे पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली असता तो सराईत वाहनचोर असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी चोरीच्या १० दुचाकी जप्त केल्या. परिमंडळ-२ च्या पोलीस उपायुक्त विनीता शाहू, सहायक आयुक्त रेखा भवरे, सीताबर्डीचे ठाणेदार अतुल सबनीस, विकास दिंडोर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय दिलीप चंदन, हवालदार जयपाल राठोड, नायक चंद्रशेखर गाैतम, पंकज रामटेके, अजय निवंत, प्रशांत भोयर, मुकेश सोनी आदींनी ही कामगिरी बजावली.

यापूर्वीही कारवाई

आरोपी रिषभ याची काैटुंबिक आर्थिक स्थिती चांगली आहे. मात्र, त्याच्या वाईट सवयीमुळे त्याच्या घरच्या मंडळींनीही त्याला दूर केले आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही सीताबर्डी, नंदनवन, धंतोली, तहसील आदी पोलीस ठाण्यात वाहनचोरीचे गुन्हे नोंदलेले आहेत. यापूर्वी त्याच्या एका गर्लफ्रेण्डवरही कारवाई झाली होती. यावेळच्या गुन्ह्यात त्याच्यासोबत कोण आहे, त्याची चौकशी केली जात असल्याचे ठाणेदार अतुल सबनीस यांनी सांगितले.

Web Title: Became a criminal in the name of girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.