प्रेमाला प्रतिसाद मिळत नसल्याने तो बनला सायको : पाच जणांवर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 07:43 PM2019-02-26T19:43:33+5:302019-02-26T19:45:15+5:30

एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद मिळत नसल्याने सायको बनलेल्या एका आरोपीने एकापाठोपाठ पाच जणांवर चाकूहल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री १० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. रितिक ऊर्फ सोमेश विलास पराते (वय १९) असे आरोपीचे नाव आहे. तो तांडापेठमध्ये राहतो. घटनेनंतर त्याला लगेच पोलिसांनी अटक केली.

Because love does not get a response, he became Psycho: Assault by knife on five person | प्रेमाला प्रतिसाद मिळत नसल्याने तो बनला सायको : पाच जणांवर चाकूहल्ला

प्रेमाला प्रतिसाद मिळत नसल्याने तो बनला सायको : पाच जणांवर चाकूहल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देनागपुरातील पाचपावलीत थरार, आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद मिळत नसल्याने सायको बनलेल्या एका आरोपीने एकापाठोपाठ पाच जणांवर चाकूहल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री १० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. रितिक ऊर्फ सोमेश विलास पराते (वय १९) असे आरोपीचे नाव आहे. तो तांडापेठमध्ये राहतो. घटनेनंतर त्याला लगेच पोलिसांनी अटक केली.
आरोपी रितिकचे एका युवतीवर एकतर्फी प्रेम आहे. ती गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. पाठलाग करून तिच्याशी सलगी साधण्याचे त्याने अनेक दिवसांपासून प्रयत्न चालविले आहे. तरुणीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने तिला धमकावण्याचाही प्रयत्न केला. मात्र, तिने दाद दिली नाही. उलट त्याला पोलिसांकडे तक्रार करण्याचा धाक दाखवला. त्यामुळे तो सायको बनला. दारूच्या नशेत रितिक नेहमी उलटसुलट प्रकार करतो. सोमवारी रात्री १० च्या सुमारास त्याने हातात चाकू घेऊन तांडापेठ परिसरात गोंधळ घालणे सुरू केले. त्याची समजूत काढायला आलेल्या राजू गोविंदराव नंदनवार, जितेंद्र गुलाबराव मोहाडीकर (वय ४२), रमेश श्रावण निघारे (वय ५०), प्रतिश सुरेंद्र खापरे (वय १५) आणि मोहम्मद शेखावत अंसारी (वय ३५) या पाच जणांवर एका पाठोपाठ चाकूहल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. वस्तीतील लोकांनी एकत्र होऊन आरोपी रितिकला पकडले आणि त्याची बेदम धुलाई केली. माहिती कळताच पाचपावलीचा पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. आरोपी रितिकला प्राणघातक हल्ला करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. ठाणेदार अशोक मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
गणेशपेठ पोलिसांचा हलगर्जीपणा
आरोपी रितिक आधीपासूनच गुन्हेगारी वृत्तीचा आहे. त्याच्यावर लकडगंज आणि पाचपावली पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. पीडित तरुणीनेही दोन वेळा गणेशपेठ ठाण्यात रितिकविरुद्ध तक्रार नोंदवली. मात्र, तेथील पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याऐवजी अदखलपात्र (एनसी) नोंद करून रितिकला सोडून दिले. त्यामुळेच सोमवारी रात्रीचा थरार घडला. गणेशपेठ पोलिसांनी त्याला अटक करून आतमध्ये डांबले असते तर हा प्रकारच घडला नसता, अशी प्रतिक्रिया या घटनेनंतर उमटली आहे.

Web Title: Because love does not get a response, he became Psycho: Assault by knife on five person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.