‘सेक्स अपील’ नसल्यानेच शेतकरी उपेक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 01:37 AM2017-09-10T01:37:03+5:302017-09-10T01:38:36+5:30
सध्याचे जग ग्लॅमरचे आहे. जे खपते तेच विकले जाते. शेती आणि शेतकरी या विषयात ‘सेक्स अपील’ नाही. म्हणूनच या देशात शेतकरी हा कायम उपेक्षेचा विषय ठरत आला आहे, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्याचे जग ग्लॅमरचे आहे. जे खपते तेच विकले जाते. शेती आणि शेतकरी या विषयात ‘सेक्स अपील’ नाही. म्हणूनच या देशात शेतकरी हा कायम उपेक्षेचा विषय ठरत आला आहे, अशा कठोर शब्दात ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे यांनी सरकारी व्यवस्थेवर प्रहार केला.
नानू नेवारे यांनी काढलेल्या ‘माझा शेतकरी’ या विषयाला समर्पित तीन दिवसीय छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी संध्याकाळी चिटणवीस सेंटर येथे त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. विदर्भ कला अकादमीतर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी कवी व विचारवंत डॉ. यशवंत मनोहर तर प्रमुख अतिथी म्हणून चित्रकार प्रमोदबाबू रामटेके, हरिहर पेंदे,डॉ. विनोद इंदूरकर उपस्थित होते. वानखडे पुढे म्हणाले, आतापर्यंत ३ लाख ७० हजार शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. हा अधिकृत आकडा आहे. नोंद न झालेल्या मृत शेतकºयांचा आकडा तर याहून खूप मोठा आहे. हे विदारक चित्र शासनाला दिसत नाही. ते गाय पोसणाºया शेतकºयांना सोडून गायीच्या स्वरक्षणात लागले आहेत. नेवारे यांनी आपल्या छायाचित्रातून अशा ‘नॉन ग्लॅमरस’ शेतकºयांच्या व्यथा मांडल्या याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. प्रमोदबाबू रामटेके म्हणाले, ही फक्त छायाचित्रे नाहीत तर कलाकृती आहेत. कारण त्या कॅमेºयातून काढल्या असल्या तरी त्या चित्रात अर्थ शोधणारी दृष्टी कलावंताची आहे. डॉ. यशवंत मनोहर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व वक्त्यांच्या भाषणाचा परमार्श घेतला आणि ही छायाचित्रे वास्तवामागील वास्तव मांडणारी असून त्यातील शेतकºयांच्या वेदना पाहता क्षणीच अस्वस्थ करीत असल्याचे सांगितले. यावेळी हरिहर पेंदे व डॉ. विनोद इंदूरकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन रमेश लखमापुरे यांनी केले.